एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Viral Video : साडी नेसून महिलांचा 'हुतूतू', व्हिडीओ पाहून नेटकरीही भारावले

Trending Video : साडी नेसलेल्या महिलांचा कबड्डी खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Trending Kabaddi Video : तुम्ही आजपर्यंत वेगवेगळ्या खेळाडूंचे भन्नाट व्हिडीओ (Viral Video) पाहिले असतील. धोनीचा हेलिकॉप्टर शॉट, विराटचा विक्रम असो किंवा मग फुटबॉलपटूंचे थरारक गोल असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. हे खेळाडू संपूर्ण तयारीनिशी त्यांच्या जर्सीमध्ये किंवा स्पोर्टस आऊटफिटमध्ये दिसतात. पण असे खेळ पारंपारिक पोशाखात खेळले तर... असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. मॅटवरील कबड्डी तुम्ही पाहिली असेल, पण मातीत साडी नेसून महिलांना कबड्डी खेळताना तुम्ही पाहिलं नसेल. मात्र आम्ही आज तुमच्यासाठी असाच एक खास व्हिडीओ घेऊन आलो आहोत. 

सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर साडी नेसलेल्या महिलांचा कबड्डी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये साडी नेसलेल्या महिलांना कबड्डी खेळताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही साडी नेसून कबड्डी खेळताना दिसत आहेत. इतकंच नाही तर आजूबाजूला उपस्थित नागरिक या महिलांना उत्साहाने प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

येथे पाहा व्हायरल व्हिडीओ

साडी नेसून महिला कबड्डी खेळाताना पाहणं फारच खूप मनोरंजक आहे. हा व्हिडीओ छत्तीसगडमधील आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. छत्तीसगड ऑलिम्पिक स्पर्धेतील हा व्हायरल व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये साडी नेसलेल्या महिला कबड्डी खेळत आहेत. या सामन्यात एक पंचही दिसत आहे आणि इतर गावकरी महिलांचा खेळ पाहून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे. हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

भारतीय संस्कृतीचं दर्शन

या व्हिडीओमध्ये भारतीय संस्कृतीचं दर्शन होत असल्याने नेटकरी खूपच प्रभावित झाले आहेत. भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. विविधतेने नटलेल्या भारताचं जगभरात आकर्षण आहे. भारतातील संस्कृतीचं जगभरात विशेष आकर्षण आहे. यानेच प्रभावित होऊन जगभरातील पर्यटकही भारतात येत असतात. दरम्यान, मातीतील खेळातही भारतीय संस्कृतीचं सौंदर्य लाभल्याची प्रतिक्रिया काही नेटकरी व्यक्त करत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Delhi : अजित पवारांच्या दिल्लीवारीमुळे भुवया उंचावल्याMarkadwadi Protest : व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचा दावाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज 3  डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Embed widget