Viral News : बॉस असावी तर अशी! आपल्या 10 कर्मचाऱ्यांना एका झटक्यात केले श्रीमंत, बोनसची रक्कम ऐकून कर्मचारी थक्क
Viral News : या मोठ्या मनाच्या बॉसची सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात चर्चा होत आहे. यावर नेटकरी म्हणतात की, बॉस असावी तर अशीच!
![Viral News : बॉस असावी तर अशी! आपल्या 10 कर्मचाऱ्यांना एका झटक्यात केले श्रीमंत, बोनसची रक्कम ऐकून कर्मचारी थक्क Viral marathi News australian lady boss gives 10 employees more than 80 lakh as christmas bonus Viral News : बॉस असावी तर अशी! आपल्या 10 कर्मचाऱ्यांना एका झटक्यात केले श्रीमंत, बोनसची रक्कम ऐकून कर्मचारी थक्क](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/337c2a98e13a248f1f10b77600ae7c511671005859096381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Viral News : एका महिला बॉसने (Lady Boss Viral News) आपल्या कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा बोनस देऊन आश्चर्यचकित केले. महिलेने ख्रिसमसच्या (Christmas) निमित्ताने तिच्या 10 कर्मचाऱ्यांना $1 लाख म्हणजेच भारतीय चलनातील 80 लाख रुपयांहून अधिक बोनस जाहीर केला आहे. या महिला बॉसने अचानक बैठकीत बोनस जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आता या मोठ्या मनाच्या बॉसची सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात चर्चा होत आहे. यावर नेटकरी म्हणतात की, बॉस असावी तर अशीच!
आपल्या 10 कर्मचाऱ्यांना एका झटक्यात श्रीमंत केले
ऑस्ट्रेलियाच्या रॉय हिल कंपनीच्या बॉस जीना राइनहार्टबद्दल सध्या जगभरात चर्चा आहे, जिने आपल्या 10 कर्मचाऱ्यांना एका झटक्यात श्रीमंत केले. त्यांनी सर्वांना बोनस म्हणून 82-82 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. याला 'ख्रिसमस बोनस' असे म्हणतात.
'ती' घोषणा ऐकून कर्मचारी चक्रावले
न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलियाच्या म्हणण्यानुसार, राइनहार्टने गेल्या आठवड्यात सर्व रॉय हिल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या घोषणेसाठी तयार राहण्यास सांगितले. यानंतर बैठक बोलावून कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले की, ते 10 जणांची नावे घेणार आहेत. ज्यांना 'ख्रिसमस बोनस' म्हणून 1 लाख डॉलर्स दिले जातील. हे ऐकून कर्मचारी चक्रावले. अहवालानुसार, बोनस मिळविणाऱ्या एका कर्मचारीने तीन महिन्यांपूर्वीच कंपनीत प्रवेश केला होता.
...आणि राइनहार्टचे नशीब उजळले!
फोर्ब्सच्या मते, लोहखनिजामुळे राइनहार्टचे नशीब उजळले. त्या लोह-खनिज शोधक लँग हॅनकॉकची मुलगी आहे. राइनहार्टने आपल्या दिवंगत वडिलांची आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेली खाण आणि कृषी कंपनी, हॅनकॉक प्रॉस्पेक्टिंगची पुनर्बांधणी केली. 1992 पासून त्या कंपनीच्या कार्याध्यक्ष आहेत. रॉय हिल मॅनिंग प्रकल्प हॅनकॉकची सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे.
ऑस्ट्रेलियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
A$34 अब्ज एवढ्या संपत्तीसह, खाण उद्योगपती राइनहार्ट ऑस्ट्रेलियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या कंपनीने गेल्या 12 महिन्यांत 190 अब्ज रुपयांहून अधिक नफा कमावला आहे. द गार्डियनच्या मते, जीना राइनहार्ट बुधवारी फ्लोरिडा येथील मार-ए-लागो येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2024 च्या अध्यक्षीय प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळी देखील दिसल्या होत्या.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)