Wedding Viral Video : बघावं ते नवलंच! लग्नात वधूने पालखीऐवजी चक्क लगेज ट्रॉलीवरून केली एन्ट्री; नेटकरी म्हणाले...
Wedding Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक वधू चक्क सामानाच्या ट्रॉलीवर लग्नमंडपात येताना दिसतेय.
Wedding Viral Video : सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. पूर्वीच्या तुलनेत आता लग्नाची प्रथा खूप वेगाने बदलत चालली आहे. आजकाल लग्नाची तयारी, नवरा-नवरीचा एकंदर थाट आणि अवाढव्य खर्च याकडे पाहून अनेक जण आकर्षित होतात. लग्नाच्या वेळी वधू-वराची एन्ट्री देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते. काही वधू बाईकवरून, काही पालखीतून तर काही नाचत हॉलमध्ये एन्ट्री करताना दिसतात. मात्र, एका वधूने चक्क हटके पद्धतीने एन्ट्री केली आहे.
सध्या सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतायत. अलीकडच्या काळात लग्नमंडपात वधूची एन्ट्री मोठ्या थाटात होताना दिसत आहे. जे अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक नववधू आश्चर्यकारक पद्धतीने लग्नमंडपात प्रवेश करताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
वधू सामानाच्या ट्रॉलीमध्ये दिसली
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये वधू लग्नमंडपात चक्क ट्रोलीने एन्ट्री करतेय. या वधूला तिचा भाऊ चक्क सामानाच्या ट्रॉलीवरून घेऊन येताना दिसतोय. वधूदेखील ट्रॉलीवर उभी राहून आनंद घेताना दिसतेय.
व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...
हा व्हिडीओ प्रियंका इंदौरिया नावाच्या वधूने इन्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करण्याबरोबरच तिने या फोटोच्या आठवणीबद्दल एक किस्सा सांगितला. प्रियंकाच्या म्हणण्यानुसार, तिच्या भावांना तिला हाय हिल्स सॅंडलवर लग्नमंडपात घेऊन जायचे नव्हते. आणि त्यामुळे त्यांनी ही अनोखी युक्ती शोधली. प्रियंकासाठी हा अनुभव खूपच मजेशीर आणि भीतीदायक होता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :