Biryani: यंदाही देशात बिर्याणीला सर्वाधिक मागणी; ऑनलाईन ऑर्डर्सचा आकडा पाहून हैराण व्हाल
Online Food Order: आज जागतिक बिर्याणी दिवस आहे. भारतात मिळणारी बिर्याणी ही जगात प्रसिद्ध आहे. भारतीय पदार्थांमध्ये बिर्याणीला दरवर्षी सर्वाधिक मागणी असते, यंदाही हे सिद्ध झालं आहे.
World Biryani Day: भारत सांस्कृतिक वारशासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यातच भारतीय खाद्यपदार्थ (Food) म्हणजे अनेकांचा आवडीचा विषय. परदेशी नागरिक खास त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ चाखण्यासाठी भारताला भेट देतात. यातील सर्वात जास्त पसंत केली जाणारी भारतीय डिश म्हणजे 'बिर्याणी'.
बिर्याणी ठरली भारतीयांची आवडती डिश
भारतीयांमध्येही बिर्याणी (Biryani) सर्वात प्रसिद्ध आहे. यामुळेच सलग आठव्या वर्षी सर्वाधिक लोकांनी बिर्याणीची ऑर्डर दिली आहे. हैदराबादींना तर बिर्याणी खाण्याचा कंटाळाच येत नाही. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत एकट्या 'स्विगी' या फूड डिलिव्हरी अॅपवर 72 लाख बिर्याणी ऑर्डर करण्यात आल्या.
गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा बिर्याणीची मागणी 8.39 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या 12 वर्षापर्यंत बिर्याणीच्या एकूण ऑर्डर 1.50 कोटी होत्या.
या बिर्याणीला सर्वाधिक पसंती
तुम्ही इतर ऑनलाइन फूड प्लॅटफॉर्मवर दिलेल्या ऑर्डर्स आणि थेट रेस्टॉरंटमधून होणारी विक्री जोडल्यास, बिर्याणीच्या मागणीची संख्या अनेक पटींनी वाढेल. बिर्याणी प्रकारातील सर्वाधिक ऑर्डर करण्यात येणारी बिर्याणी म्हणजे 'दम बिर्याणी'. नऊ लाखांहून अधिक ऑर्डरसह 'दम बिर्याणी' चॅम्पियन म्हणून उदयास आली आहे. त्यापाठोपाठ 7.9 लाख ऑर्डर या बिर्याणी राईस आणि 5.2 लाख ऑर्डरसह मिनी बिर्याणीचा क्रमांक लागतो.
हैदराबादमधून सर्वाधिक ऑर्डर
सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली जाणाऱ्या शहरांच्या यादीत हैदराबाद अव्वल स्थानावर असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. हैदराबादमधून जून महिन्यातच 72 लाख बिर्याणीच्या ऑर्डर आल्या. यानंतर बंगळुरू सुमारे 50 ऑर्डरसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर चेन्नई सुमारे 30 लाख ऑर्डरसह तिसऱ्या स्थानावर आहे.
बिर्याणीच्या ऑर्डरमध्ये झालेली वाढ हे भारतीय खाद्य उद्योगासाठी सकारात्मक संकेत आहेत. यावरून असं दिसून येतं की, भारतीय या स्वादिष्ट तांदळाच्या डिशला सर्वाधिक पसंत करतात. स्विगीच्या अहवालानुसार, बंगळुरूमध्ये भारतातील सर्वाधिक बिर्याणी रेस्टॉरंट्स आहेत, सुमारे 24,000 रेस्टॉरंट्स बिर्याणी सर्व्ह करतात. 22,000 हून अधिक बिर्याणी रेस्टॉरंटसह मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर दिल्लीमध्ये 20,000 हून अधिक बिर्याणी रेस्टॉरंट आहेत.
यंदाही रेकॉर्ड बनवला
स्विगीला 2022 मध्येही दर मिनिटाला 137 ऑर्डर्स मिळाल्या आहेत. याच कारणामुळे ही डिश म्हणजेच भारतीयांची सर्वात आवडती बिर्याणी यावर्षीही सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश बनली आहे. विशेष म्हणजे गेल्या सात वर्षांपासून सर्वाधिक बिर्याणीची ऑर्डर दिली जात आहे. आठव्या वर्षीही भारतात बिर्याणीला सर्वाधिक मागणी राहिली आहे.
हेही वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )