Navratri 2023: यंदाच्या नवरात्रीत बनवा खमंग उपवासाचे अप्पे; पाहा बटाट्यांपासून बनलेल्या अप्प्यांची रेसिपी
Navratri 2023: नवरात्रीत नऊ दिवस उपवासाचा फराळ काय बनवायचा, असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल ना? तर आज जाणून घ्या एक सोपी उपवासाच्या अप्प्यांची रेसिपी...
![Navratri 2023: यंदाच्या नवरात्रीत बनवा खमंग उपवासाचे अप्पे; पाहा बटाट्यांपासून बनलेल्या अप्प्यांची रेसिपी navratri 2023 potato appe fasting recipe in marathi healthy and popular fasting recipes in marathi Navratri 2023: यंदाच्या नवरात्रीत बनवा खमंग उपवासाचे अप्पे; पाहा बटाट्यांपासून बनलेल्या अप्प्यांची रेसिपी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/62a065f271e68aa5746d9708e303928c1696946893433713_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Potato Appe Recipe: नवरात्रौत्सवास (Navratri) 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या उत्सवाची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. नवरात्रौत्सवादरम्यान अनेकांचे उपवास असतात. नवरात्रीचे नऊ दिवस काय खावं? असा प्रश्न अनेकांना पडतो. रोज-रोज तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन प्रत्येकालाच कंटाळा यातो. तुम्हीही नेहमी नेहमी उपवासाचे थालीपीठ, साबुदाण्याची खिचडी अन् बटाट्याची भाजी खाऊन बोर झाले असाल तर यावेळी बटाट्याच्या अप्प्यांची रेसिपी (Potato Appe Recipe) नक्की ट्राय करुन बघा. बटाट्याचे अप्पे कसे बनवायचे जाणून घेऊया.
बटाट्याचे अप्पे बनवण्यासाठी लागणारं साहित्य
- 2 मध्यम आकाराचे कुस्करलेले बटाटे
- 2 चमचे भिजलेला साबुदाणा
- 2 चमचे शेंगदाण्यांचा बारीक कूट
- 4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- अर्धा टीस्पून जिरे
- 2 चमचे दही
- पाणी
- मीठ चवीनुसार
- तेल गरजेनुसार
बटाट्याचे अप्पे बनवण्याची कृती
- सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या. बटाट्यांची सालं काढून बटाटे चांगले स्मॅश करुन घ्या.
- यानंतर साबुदाणा, मिरच्या, जीरे मिक्सरमधून फिरवून घ्या.
- साबुदाण्याचं मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्सरमधून फिरवून घ्या.
- आता हे तयार झालेलं मिश्रण आणि स्मॅश केलेले बटाटे एकजीव करुन घ्या.
- बटाटे आणि तयार मिश्रण एकजीव करताना त्यात शेंगदाण्याचा कुट घाला.
- मिश्रण ओलसर राहावं यासाठी त्यात दही घाला.
- मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि चांगलं मिक्स करा.
- त्यात मीठ घालून मिश्रण नीट हलवा.
- 10 मिनिटं तयार झालेलं मिश्रण झाकून ठेवा.
- अप्पे पात्र गॅसवर गरम करा.
- त्यात अगदी एकेक एक थेंब तेल घाला.
- सारणाचे गोळे करून पात्रात घाला.
- मध्यम आचेवर अप्पे दोन्ही बाजूने 3-4 मिनिट नीट शेकून घ्या.
- गोड दही किंवा उपवासाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.
नवरात्र 9 दिवस का साजरी केली जाते?
शारदीय नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते आणि शेवटचा दिवस 'विजयादशमी' (दसरा) म्हणून साजरा केला जातो, ज्यामध्ये भगवान रामाने लंकापती रावणाचा पराभव केला. तसेच देवी दुर्गाने महिषासुराचा पराभव केला. एका पौराणिक कथेनुसार, देवी दुर्गा मातेने महिषासुर या राक्षसाशी नऊ दिवस युद्ध केले आणि नंतर नवमीच्या रात्री त्याचा वध केला. तेव्हापासून देवी मातेला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणून ओळखले जाते. तेव्हापासून, माता दुर्गेच्या शक्तीला समर्पित नवरात्री व्रत पाळताना, तिच्या 9 रूपांची पूजा केली जाते.
हेही वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)