India: 'या' गावातील महिला 5 दिवस घालत नाहीत कपडे; ही नेमकी कोणती परंपरा? जाणून घ्या
Women Tradition: भारत आपल्या सांस्कृतिक वारशासाठी जगात प्रसिद्ध आहे. इथे प्रत्येक गावातील आणि शहरातील लोकांची एक वेगळी शैली आहे, वेगळी परंपरा आहे. आज अशाच एका रंजक गोष्टीबद्दल जाणून घेऊया.
हिमाचल प्रदेश: आपला भारत देश विविध संस्कृती आणि परंपरांचं माहेरघर आहे. आपल्या देशात बऱ्याच प्रचलित आणि सांस्कृतिक परंपरा (Tradition) आहेत, ज्या जगभरातील लोकांना आकर्षित करतात. याच वेळी भारतातील काही ग्रामीण भागात शतकानुशतकं चालत आलेल्या विचित्र परंपराही आहेत, ज्यांच्यावर आपला विश्वासही बसणार नाही. अशाच विचित्र परंपरांचं एक गाव म्हणजे हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कुल्लू जिल्ह्यातील पिनी गाव.
नक्की काय आहे गावातील परंपरा?
पिनी गावात एक सण साजरा केला जातो आणि तो साजरा करण्यासाठी काही नियम पाळले जातात. पहिली गोष्ट स्पष्ट आहे की, पाच दिवस चालणाऱ्या या सणादरम्यान महिलांना वस्त्र परिधान करण्याची परवानगी नाही. यातील अजून एक विचित्र गोष्ट म्हणजे, या सणादरम्यान महिल्यांना हसण्यावरही बंदी आहे. या सणादरम्यान महिला हसू शकत नाहीत.
पाच दिवस महिला राहतात निर्वस्त्र
श्रावणाच्या महिन्यात आयोजित करण्यात येणारा हा सण पाच दिवस चालतो, या दरम्यान महिला नग्न असतात आणि साधारणत: या सणादरम्यान त्या घरातच राहतात. पाच दिवस चालणाऱ्या या सणादरम्यान घरातील महिला गावातील पुरुषांसमोर जात नाहीत. सण संपेपर्यंत महिला घरातच निर्वस्त्र राहतात.
भाद्र महिन्याच्या पहिल्या दिवशी लहू घोंड देवतेने राक्षसाचा पराभव केला, त्या क्षणाच्या स्मरणार्थ या गावात हा कार्यक्रम आयोजित केला जातो. असं मानलं जातं की, राक्षसाने महिलांच्या प्रतिष्ठेवर हल्ला केला होता, त्यांचे कपडे फाडले होते आणि कदाचित यावरून या गावातील महिला सणाच्या वेळी कपडे घालत नाहीत, हे स्पष्ट होतं.
वेळेसोबत परंपरेत थोडा बदल
कपडे काढल्यानंतर स्त्रिया आपली अब्रू वाचवण्यासाठी लोकरीच्या पट्ट्या वापरतात. एकंदरीत, पिनी गावातील रहिवासी काही वेळा अतिशय नियमांशी अनुरुप जीवन जगतात. तरी, काळानुसार गावातील काही तरुण पिढीतील महिलांनी ही परंपरा बदलली आहे. तरुण पिढीतील महिला आता या सणादरम्यान अतिशय पातळ कपडे परिधान करतात, तर वृद्ध स्त्रिया अजूनही सणाच्या वेळी नग्न राहण्याची जुनी परंपरा पाळतात.
या काळात केवळ महिलाच नाही, तर पुरुषही काही नियम पाळतात. जसं की ते दारू पिऊ शकत नाहीत आणि मांसाहारही करू शकत नाहीत. एवढंच नाही तर या पाच दिवसात पती-पत्नी एकमेकांशी बोलतही नाहीत.
हेही वाचा: