एक्स्प्लोर

VIDEO: हे कसलं प्रेम? गर्लफ्रेंड हातावर चावली, तर बॉयफ्रेंडने दातांच्या निशाणांचा बनवला टॅटू; नेटकऱ्यांनी सुनावलं

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीसाठी एक खास टॅटू बनवला, पण नेटकऱ्यांनी टॅटूवरुन या जोडप्याला चांगलंच सुनावलं आहे.

Weird News: आजकाल अनेकजण कूल आणि डॅशिंग दिसण्यासाठी शरीराच्या विविध भागांवर टॅटू (Tattoo) बनवू लागले आहेत. लोक त्यांच्या आवडीनुसार विविध प्रकारचे टॅटू बनवतात. पण सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेले टॅटूचे दोन व्हिडिओ पाहून अनेकांचं डोकं फिरलं आहे. या व्हिडिओंमध्ये असं दिसून येतं की, एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीसाठी एक अनोखा टॅटू बनवला आहे. मात्र, नेटकऱ्यांना हे टॅटू फारसं आवडलं नाही, त्यामुळे लोक या जोडप्यांना सतत सुनवत आहेत.

नेमका प्रकार काय?

पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हला दिसेल की, एका मुलीने प्रथम तिच्या बॉयफ्रेंडच्या हाताचा चावा घेतला. चावल्यानंतर हातावर जे दातांचे निशाण उमटले, त्याला नंतर टॅटूचं स्वरूप देण्यात आलं. वास्तविक, बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडच्या लव्ह बाईटचा टॅटू बनवून घेतला. टॅटूमध्ये गर्लफ्रेंडचं नाव आणि ज्या तारखेला टॅटू बनवला, ती तारीख देखील लिहिण्यात आली. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले. त्यांनी या जोडप्याला चांगलंच सुनावलं.

एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'पुरे झालं यार, पुरे झालं, मी आता इंस्टाग्राम डिलीट करत आहे.' तर दुसऱ्या एकाने लिहिलं की, 'खरंच, मी इतका घाणेरडा टॅटू याआधी कधीच नाही पाहिला.'

View this post on Instagram
 
A post shared by A K A S H⚡️G U J J U (@skytattoos111)

खांद्यावर बनवला गर्लफ्रेंडच्या ओठांचा टॅटू

टॅटूचा आणखी एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका गर्लफ्रेंडने तिच्या बॉयफ्रेंडच्या खांद्यावर लिपस्टिकने पप्पी दिली. यानंतर बॉयफ्रेंडने खांद्यावर उमटलेल्या लिपस्टिकच्या निशाणाचा टॅटू बनवला, त्यावर टॅटू ज्या दिवशी बनवला ती तारीख देखील टाकली.

नेटकरी या व्हिडिओवर खूप विचित्र कमेंट्सही करत आहेत. एका युजरने म्हटलं की, 'मी मरेन पण हे कधीच करणार नाही'. तर दुसरा युजर म्हणाला, 'भाऊ, यापेक्षा त्याने त्याच्या आईवर प्रेम केलं असतं तर परवडलं असतं.'

आजकाल जोडपे आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे असले भलत्याच प्रकारचे टॅटू बनवत आहेत. मात्र त्यांना नेटकऱ्यांकडून या कामाची दाद मिळत नाही, असे काही विचित्र प्रकार पाहताच लोकांचं पित्त खवळतं आणि ते अशा लोकांना ट्रोल करू लागतात.

हेही वाचा:

CCTV : नातेवाईक सोफ्यावर बंदूक विसरले, चिमुकलीने खेळता खेळता स्वत:वरच झाडली गोळी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget