ठाण्यात पंडित धायगुडे करणार विश्वविक्रम, 270 किलो वजनाच्या बाइक 150 वेळा नेणार पोटावरून
ठाण्यात आज 250 किलोपेक्षा जास्त वजनाच्या सुपरबाईक आपल्या पोटावरून जाऊ देण्याचा विश्वविक्रम ठाण्याच्या धर्मवीर मैदानात पाहायला मिळणार आहे.

ठाणे : ठाणेकरांसाठी आजचा रविवार विश्वविक्रमी ठरणार आहे. तब्बल 250 किलोपेक्षा जास्त वजनाच्या सुपरबाईक आपल्या पोटावरून जाऊ देण्याचा विश्वविक्रम ठाण्याच्या धर्मवीर मैदानात पाहायला मिळणार आहे. ध्येयवेढ्या माणसांना विक्रमाचं क्षितीज सारखं खुणावत असतं आणि त्यासाठी सगळी ताकद, मेहनत पणाला लावून ते आपलं ध्येय गाठतातच. मूळचे सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त मुंबईत आलेले पंडित तुकाराम धायगुडे हे त्यापैकीच एक. त्यांनी त्यांच्या पोटावरून अंदाजे 270 किलो वजनाच्या दुचाकी जाऊ देण्याचा विश्वविक्रम दुस-यांदा करत आहेत.
जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यास घेतलेले मुळचे पनवेल, कळंबोली येथील पंडित तुकाराम धायगुडे यांनी आपल्याच नावावर पोटावरून दुचाकी अशाप्रकारे 121 वेळा दुचाकी नेण्याचा विक्रम साल 2016 मध्ये केला होता. आपला हाच पहिला विक्रम मोडत पुन्हा एकदा पोटावरून किमान 150 वेळा गाडी जाऊ देण्याचा विश्वविक्रम करण्याचा त्यांचा मानस आहे. याशिवाय एका मिनिटांत किमान 100 साईड सीट अप्सचा विश्वविक्रम करण्याचाही त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
कोण आहेत पंडित धायगुडे?
धायगुडे यांचा जन्म 1 जून, 1980 साली सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील धायगुडे वस्तीत झालाय .
घरात आई-वडील आणि तीन भावंडे असल्याने गरिबीचे चटके सोसतच त्यांचे बालपण गेले.
परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी जतमध्ये पूर्ण केले, तर पुढील शिक्षण घेण्याची ऐपत नसल्याने बाहेरून पदवी मिळवली.
पंडित धायगुडे यांना लहानपणापासूनच खेळाची आवड असल्याने त्यांनी ‘अॅथलिट’ म्हणून सुरुवात केली.
सुरुवातीला 100 मीटर, धावले. परंतु, राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे, तर सराव महत्त्वाचा होता.
गरीबीमुळे कामानिमित्ताने मुंबईत आले अन बकरी मंडईमध्ये काम करत सराव केला
त्यानंतर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून 2003 साली त्यांची शिपाईपदी नियुक्ती झाली.
बँकेच्या माध्यमातून विविध स्पर्धांमधून पाच, दहा, व 21 किलोमीटर धावणे सुरूच होते.
धायगुडे यांनी 28 ऑगस्ट, 2016 मध्ये ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ केला. 257 किलो वजनाच्या दोन दुचाकी लागोपाठ 121 वेळा नेण्याचा विक्रम केला
सामाजिक जाणिवेतून होतकरू विद्यार्थ्यांसाठी सांगली, मुलुंड व कोपरखैरणे याठिकाणी कराटे क्लासेस सुरू केले.
त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चारवेळा ‘ब्लॅक बेल्ट’ पटकावला.
2018 रोजी कराटेमध्ये 1 हजार 310 पंच मारून त्यांनी ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ आपल्या नावावर केला.
भविष्यात सतत प्रयत्न करून युवापिढीला आत्मपरीक्षणचे धडे देण्याचे कार्य करायचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
