Sindhudurga News: सिंधुदुर्गातील वेंगुर्ला बोट दुर्घटनेतील चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले
Sindhudurg Boat News: वेंगुर्ले बंदरात बुधवारी (23 मे) रात्री मच्छिमार बोटींना लागणार बर्फ घेऊन बोट घऊन जात असताना बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण सात खलाशी होते.
मुंबई : वेंगुर्ले बंदरात खलाशांना (Sindhudurg News) घेऊन बोट पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेतील चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले आहेत. काल दोन तर आज दोन मृतदेह सापडले आहेत. बोट बुडून मृत झालेल्या चार पैकी तीन मध्यप्रदेश तर एक जण रत्नागिरी मधील खलाशी होते. आझाद मुनीलाल कोल, चांद गुलाल महमद, शिवराम कोल हे तिघे मध्य प्रदेश मधील तर महादेव शंकर आंबेरकर हा मूळचा रत्नागिरीचा होता. हे सर्व खलाशी वेंगुर्ले येथे मासेमारी बोटीवर कामाला होते.
वेंगुर्ले बंदरात बुधवारी (23 मे) रात्री मच्छिमार बोटींना लागणार बर्फ घेऊन बोट घऊन जात असताना बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण सात खलाशी होते. बोट पलटी झाल्यानंतर तीन जणांनी पोहून किनारा गाठला. तर चार जण बेपत्ता होते, त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघे जणांचे मृतदेह आज सापडले. वेंगुर्ला बंदरातून रात्री मच्छिमारांना लागणारा बर्फाची वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडला. रात्री ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यामुळे ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला.
महाराष्ट्रात या आठवड्यात 10 दुर्घटना
महाराष्ट्रात या आठवड्यात 10 दुर्घटना घडल्या असून यात 40 निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये बोट पलटून मृत्यू झाल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. सिंधुदुर्गात चौघांचा, उजनीत सहा आणि प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. बोट पलटून तब्बल 16 जणांचाा मृत्यू झाला आहे.
बीड जिल्ह्यात दोन मुलांसह महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनपुर (ता.अंबाजोगाई) येथील महिलेचा दोन मुलांसह विहिरीत बुडून मृत्यू झाला. द्रौपदी संतोष गोईनवाड, पूजा (7), सुदर्शन (7) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भावली धरणात पाच जणांचा बुडून मृत्यू
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) भावली धरण (Bhavali Dam) परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पाच जणांचा धरणात बुडून (Drown) मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. मृतांमध्ये तीन मुलींसह दोन तरुणाचा समावेश आहे. हे सर्वजण नाशिकरोड (Nashikroad) येथील गोसावीवाडीतील रहिवासी आहेत. या घटनेमुळे गोसावीवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. हनिफ शेख, अनस खान दिलदार खान (15), नाझिया इमरान खान (15), मीजबाह दिलदार खान (16) आणि ईकरा दिलदार खान (14) अशी मृतांची नावे आहेत.
हे ही वाचा :