एक्स्प्लोर

Crime News: गावात मित्रासोबत समलैंगिक संबंध, माऊलीला समजलं; शीर, हात, पाय कटरने कापून पोत्यात भरले!

Crime News: माऊलीची एवढ्या निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.

Crime News: अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी हद्दीत असलेल्या दाणेवाडी गावातील एका विहिरीत 12 मार्च रोजी एक अनोळखी मृतदेह आढळला होता. मृतदेहाचे शीर आणि पाय तोडून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला होता. तर दुसरीकडे याच दाणेवाडी गावातील माजी सरपंच अनिल गव्हाणे यांचा 19 वर्षीय पुतण्या माऊली गव्हाणे हा देखील 6 मार्चपासून शिरूर येथून बेपत्ता झाला  होता. 12 मार्चला  दाणेवाडी गावातील विहिरीमध्ये छिन्न विछिन्न अवस्थेत आढळलेला मृतदेह माऊलीचाच असावा असा संशय व्यक्त होत असताना दाणेवाडीतील आणखी एका विहिरीत एक शीर आणि काही अवयव एका गोणीत फेकून दिल्याचे आढळून आले. दरम्यान या शीराच्या कानातील बाळीवरून हा मृतदेह हा माऊलीचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दाणेवाडी गावावर शोककळा पसरली. माऊलीची एवढ्या निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.

गावात मित्रासोबत समलैंगिक संबंध, माऊलीला समजलं-

समलैगिंक संबधांतून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. संशयित आरोपी सागर दादाभाऊ गव्हाणे याचे गावातील एका मित्रासोबत समलैंगिक संबंध होते. ही बाब मयत माऊली गव्हाणेला समजली होती. याच कारणातून माऊलीची हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. माऊली आपल्या समलैंगिक संबंधांची गावात वाच्यता करेन, या भीतीपोटी आरोपींनी दीड महिन्यापूर्वी कट शिजवला.

शीर, हात, पाय कटरने कापून पोत्यात भरले!

पोलिसांनी या प्रकरणात सागर गव्हाणे याला अटक केली आहे. तर, दुसरा आरोपी हा अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या दोघांनी संगनमताने माऊलीची हत्या केली. 6 मार्चच्या दिवशी माऊलीला रात्री 11.30 च्या सुमारास दोघा आरोपींनी बोलवून घेतले. आम्ही तुला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास टॉर्चचा उजेड तुझ्या घराकडे दाखवू, त्यानंतर तो सिग्नल समजून तू आमच्याकडे ठरलेल्या ठिकाणी ये, त्यानुसार टॉर्चचा उजेड पाहून माऊली रात्री सुमारे साडेअकरा वाजता त्या समलैंगिक जोडप्याकडे गेला. त्यानंतर दोघांनी त्याचा गळा आवळून खून केला. नंतर इलेक्ट्रिक कटरच्या मदतीने त्याचे हात,पाय, धड आणि शीर वेगवेगळे केले आणि गावातील विहीरीत मृतदेहाचे अवयव पोत्यात भरुन फेकून दिले. दरम्यान,गुन्हेगारांनी अतिशय नियोजन करून हा गुन्हा केला होता. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या योग्य तपासामुळे काही दिवसांतच आरोपींना ताब्यात घेऊन सत्य समोर आणण्यात पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी तपासाला गती मिळाली आणि या प्रकरणाचा तपास झाला.

संबंधित बातमी:

Pune Crime News : विहिरीत शीर, हात नसलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ अखेर उकललं! समलिंगी संबंधाची कुणकूण लागली, भेटायला बोलावलं अन्...; नेमकं काय घडलं?

महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025, VIDEO:

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: दुचाकीची ओला कॅबला धडक लागल्याने उफाळला वाद, चालक अन् प्रवाशाने तरुणाला रस्त्यावरच संपवलं; मुंबई हादरली!
दुचाकीची ओला कॅबला धडक लागल्याने उफाळला वाद, चालक अन् प्रवाशाने तरुणाला रस्त्यावरच संपवलं; मुंबई हादरली!
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Jalna Gas Cylinder News: जालन्यात गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून 110 सिलिंडर चोरले; अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जालन्यात गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून 110 सिलिंडर चोरले; अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mumbai Crime News: मुलुंड स्टेशनवर पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मृत्युपूर्वी काही तास आधी महिलेची पोलिसांमध्ये तक्रार
मुलुंड स्टेशनवर पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मृत्युपूर्वी काही तास आधी महिलेची पोलिसांमध्ये तक्रार

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget