Satara News : मायेलकींचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ; घातपात की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क
Satara Crime : घरापासून अर्धा किमी अंतरावर विहिरीत शोभा गावडे यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर विहिरीतून पाणी बाजूला करून शोध घेण्यात आल्यानंतर मुलगी साक्षीचाही मृतदेह सापडला.
सातारा : सातारा जिल्ह्यातील (Satara Crime) फलटण तालुक्यातील बटईमध्ये विहिरीत मायलेकींचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विहिरीमध्ये शोभाताई गावडे (वय 45) आणि साक्षी तानाजी गावडे (वय 14) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आत्महत्या की घातपात? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
घातपात की आत्महत्या याबाबत साशंकता
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार बटईच्या हद्दीत घरापासून अर्धा किमी अंतरावर विहिरीत शोभा गावडे यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर विहिरीतून पाणी बाजूला करून शोध घेण्यात आल्यानंतर मुलगी साक्षीचाही मृतदेह सापडला. दरम्यान, शोभा यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या दोन मुलींचा विवाह झाला आहे. त्यामुळे घातपात की आत्महत्या याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
खंबाटकी बोगद्याजवळ मृतदेह आढळला
अन्य एका घटनेतत सातारा जिल्ह्यातील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी वळणावरील नाल्यात पुण्यातील तरुणाचा मृतदेह आढळून आला. तो पुण्यातील बावधनमधील आहे. ध्रुव स्वप्निल सोनावणे (वय 18 रा. बावधन, पुणे) असे त्याचे नाव आहे. तो रविवारी घरातून निघून गेला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंबाटकी बोगद्यानंतरच्या पहिल्याच वळणावर ध्रुव सोनावणे दुचाकीसह नाल्यामध्ये पडला होता. मात्र, त्याठिकाणी झुडपाळ भाग असल्याने कोणाच्याही निर्दशनास आलं नाही. झुडपे काढल्यनंतर त्याचा मृतदेह दिसून आला. अपघात होऊन मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नवऱ्याचा खून करून हातपाय बांधून कालव्यात फेकले, पत्नीसह प्रियकराला बेड्या
दरम्यान, फलटणमध्ये दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. शहरातील शिवाजीनगरमधील बेपत्ता तरुणाचा खून झाल्याचे समोर आलं आहे. अजित बुरुंगले (वय 24) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पत्नीने प्रियकराच्या साथीने तसेच अन्य एकाच्या मदतीने खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयित अजितची पत्नी शिवानी (वय 19), तिचा प्रियकर करण विठ्ठल भोसले (रा. थेऊर रोड, केसनंद, पुणे) या दोघांना शिताफीने तपास करून अटक केली आहे. यांना मदत करणारा तिसरा संशियत राहुल उत्तम इंगोले (वय 22 रा. वाघोली, पुणे) हा अजून फरार आहे. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत पत्नी शिवानीकडे कसून चौकशी केली. चौकशीत शिवानीचे करणशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रेमसंबंधात आणि लग्न करण्यात नवरा अडथळा वाटू लागला होता.
इतर महत्वाच्या बातम्या