एक्स्प्लोर

Pushpa 2 Box Office Collection In Hindi: हिंदी बेल्टमध्ये 'पुष्पा 2' चाच डंका; 'सिंघम अगेन'च्या दुप्पट कलेक्शन फक्त सहा दिवसांत, 400 कोटींपासून काही पावलं दूर

Pushpa 2 Box Office Collection Day 6 In Hindi: ‘पुष्पा 2: द रुल’ हिंदी भाषेत बुलेटपेक्षाही वेगाने कमाई करत आहे. रिलीजच्या 6 दिवसांत 400 कोटींचा टप्पा गाठण्यापासून हा चित्रपट इंच दूर आहे.

Pushpa 2 Box Office Collection Day 6 In Hindi: अल्लू अर्जुननं (Allu Arjun) बॉक्स ऑफिसवर (Box Office) इतिहास रचला आहे. 'पुष्पा 2: द रुल'नं (Pushpa 2 The Rule) बॉक्स ऑफिस अक्षरशः हादरवून सोडलंय. अल्लू अर्जुनचं स्टारडम दररोज भल्या भल्या स्टार्सचे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. विशेष म्हणजे, हा पॅन इंडिया चित्रपट असला तरीसुद्धा हिंदी सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय. हिंदी भाषेतील या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि त्याचवेळी तो प्रचंड नफाही कमावत आहे. रिलीजच्या 6 दिवसांतच या चित्रपटानं आतापर्यंत अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. 'पुष्पा 2: द रुल'नं रिलीजच्या 6 व्या दिवशी म्हणजेच, पहिल्या मंगळवारी हिंदी भाषेत किती कोटी रुपये कमावलेत? जाणून घेऊयात सविस्तर... 

'पुष्पा 2: द रुल' नं रिलीजच्या 6 व्या दिवशी हिंदी भाषेत किती कलेक्शन केलं?

'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा पॅन इंडिया चित्रपट तमिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित झाला. 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. तसं पाहिलं तर, चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच रेकॉर्डब्रेक अॅडव्हान्स बुकिंग केलं होतं. थिएटर्समध्ये धडकल्यानंतर या चित्रपटानं एकच खळबळ उडवून दिली आणि जबरदस्त ओपनिंग केली. त्यानंतर विकेंडलाही 'पुष्पा 2: द रुल'नं इतिहास रचला. आता हा चित्रपट विक डेजमध्येही कमाल करत आहे. विशेषत: हिंदी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांना वेड लावत आहे आणि यासोबतच तो हिंदी बॉक्स ऑफिसवर दररोज मोठी कमाई करत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

चित्रपटाच्या हिंदी भाषेतील कमाईबद्दल बोलायचं झालं तर, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी 70.3 कोटी, दुसऱ्या दिवशी 56.9 कोटी, तिसऱ्या दिवशी 73.5 कोटी आणि 85 कोटी रुपयांचा गल्ला केला. चौथ्या दिवशी आणि पाचव्या दिवशी 46.4 कोटी रुपये कमावले. अशातच आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवसाच्या म्हणजेच, पहिल्या मंगळवारच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.

  • सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2: द रुल'नं सहा दिवसांत हिंदीमध्ये 38 कोटींची कमाई केली आहे. 
  • यासोबतच 'पुष्पा 2: द रुल'चा हिंदी भाषांमध्ये 6 दिवसांचं एकूण कलेक्शन आता 370.1 कोटी रुपये झालं आहे. 
  • तसेच, सर्व भाषा मिळून 'पुष्पा 2: द रुल'नं 6 दिवसांत एकूण 645.95 कोटींची कमाई केली आहे. 

'पुष्पा 2' नं हिंदीतील एक सोडून सर्व दाक्षिणात्या चित्रपटांना धूळ चारली 

एक वगळता, पुष्पा 2 नं कोविडनंतर प्रदर्शित झालेल्या सर्व हिंदी डब केलेल्या दक्षिण भारतीय चित्रपटांना मागे टाकलं आहे. सध्या, पुष्पा 2 कन्नड सुपरस्टार यशच्या 2022 मध्ये रिलीज होणाऱ्या KGF: Chapter पासून एक पाऊल दूर आहे. बॉक्स ऑफिसवर 6 दिवसांत हिंदी भाषेत एकूण 370 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह, पुष्पा 2 नं या हिंदी डब केलेल्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

  • केजीएफ: चॅप्टर 2 (2022): 434.62 कोटी
  • पुष्पा 2 (2024): 379 - 370 कोटी
  • कल्कि 2898 एडी (2024): 295 कोटी
  • आरआरआर (2022): 277 कोटी
  • 2.0 (2018): 188 कोटी
  • सालार (2023): 152 कोटी
  • आदिपुरुष (2023): 147 कोटी
  • पुष्पा (2021): 106 कोटी
  • कांतारा (2022): 81.10 कोटी
  • देवारा (2024): 68.14 कोटी

हिंदी बॉक्स ऑफिसवर 400 कोटींपासून एक इंच दूर

पुष्पा 2 बुधवारी हिंदी भाषेत 400 कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल, त्यामुळे सात दिवसांत हा आकडा गाठणारा सर्वात जलद चित्रपट ठरेल. दरम्यान, चित्रपटाचा वेग पाहता, बॉक्स ऑफिसवर त्याचं आयुष्यभराचं कलेक्शन 650 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असेल असं आतापर्यंतच्या चित्रावरुन दिसतंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pushpa 2 Flop: बॉक्स ऑफिस गाजवणारा 'पुष्पा 2' एका ठिकाणी सुपरफ्लॉप; 40 कोटींच्या 'या' चित्रपटासमोर कमावले फक्त 3.55 कोटी, थेट धोबीपछाड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Best Bus Accident Update : आरोपी चालकाने क्लच समजून बसच्या एक्सिलरेटरवर पाय दिल्याने अपघातRahul Gandhi Viral Video : राहुल गांधी किराना दुकानात वस्तू विकतात तेव्हाABP Majha Headlines :  8 AM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 11 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Kurla Bus Accident: संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Embed widget