Pune Crime News: पिंपरी-चिंचवड हादरलं! अज्ञाताकडून भर रस्त्यात गळा चिरून हत्या
चाकणच्या नानेकर वाडीत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. शशिकांत शिवाजी काशीद अस खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Pune Crime News: चाकणच्या नानेकर वाडीत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. शशिकांत शिवाजी काशीद अस खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते महिंद्रा कंपनीत कामाला होते अशी प्राथमिक माहिती आहे. रात्री उशीरा नानेकर वाडीच्या गायरान परिसरात बोलावून अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांचा खून केला आहे. आज सकाळी आठ च्या सुमारास ही घटना समोर आली असून अज्ञात आरोपीचा शोध चाकण पोलीस घेत आहेत.
नक्की काय आहे प्रकरण?
शशिकांत शिवाजी काशीद हे महिंद्रा कंपनीत कामाला होते. चाकणच्या नारेकर वाडीत रहायला होते. रात्री उशीरा त्यांना याच परिसरातील गायरान भागात बोलून त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केला. हल्यात धारदार शस्त्राने गळा चिरुन शशिकांत यांचा खून करण्यात आला. या खूनामुळे चाकण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सकाळी शशिकांत यांच्या मृतदेह नजरेस आला. या सगळ्या प्रकरणाचा चाकण पोलीस तपास करत आहेत.
पित्याकडून मुलाची हत्या
पिंपरी चिंचवड शहरातील मोशी संकुलात पित्याने आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. कौटुंबीक वादातून सकाळी सहा वाजता युवराज अशोक सावळे यांची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर वडिलांनी स्वतः पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली होती.
यापुर्वी आईसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे मुलाने संबंधित व्यक्तीची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे घडली होती. मृताचे आईसोबत अनैतिक संबंध असल्याने मुलगा संतापला होता. त्यातून मुलाने हत्येचा कट रचला. निर्जन ठिकाणी नेऊन अल्पवयीन मुलाने त्याची हत्या केली होती. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. दीपक वाघमारे असे मृताचे नाव होतं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
पिंपरी-चिंचवड परिसरात गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यात सगळ्याच प्रकारचे गुन्हे आहे. मात्र खून आणि चोरीच्या गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे परिसरात अनेकदा भीतीचं वातावरण असतं. आतापर्यंत दोनवेळा मुलाने आईची हत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या दोन्ही घटना ताज्या असतानाच या नव्या घटनेने पिंपरी-चिंचवड हादरलं आहे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
