Pune Crime News: धक्कादायक! शाळेतून घरी येताना 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपी फरार
पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात गुरुवारी शाळेतून घरी जात असताना एका व्यक्तीने 11 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे
Pune Crime News: पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात गुरुवारी शाळेतून घरी जात असताना एका व्यक्तीने 11 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र अपहरणाचा प्रयत्न थांबवण्यात मुलगी आणि तिच्या मित्राला यश आले. या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध सुरू केला आहे.
नक्की काय घडलं?
मुलगी आणि तिची मैत्रिण शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. तिच्यासमोर एक कार अचानक थांबली आणि एक अनोळखी माणूस बाहेर पडला. त्यामुलीच्या मुलीच्या जवळ आला. तिच्या वडिलांनी तिला शाळेतून घरी आणण्यासाठी पाठवले आहे, असं तिला सांगितलं. त्यामुलीने हुशारीकरुन त्याच्यासोबत गाडीत बसण्यास नकार दिला. त्याने तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिच्या मैत्रिणीने पाहिल्यावर ती मदतीसाठी आरडाओरडा करू लागली. त्यावेळी मित्राने त्यांची मदत केली. त्यानंतर हा व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेला.
आई-वडिलांकडून पोलिसात तक्रार
मुलीने घरी आल्यानंतर मला घरी आणण्यासाठी कोणाला शाळेत पाठवलं होतं का असा प्रश्न मुलीने वडिलांंना केला. त्यावेळी वडिलांनी नकार दिला नंतर मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. मैत्रिणीने पाहिल्यावर ती मदतीसाठी आरडाओरडा करू लागली. त्यावेळी मित्राने त्यांची मदत केली, असं सुद्धा सांगितलं. त्यानंतर त्यांनी भोसरी पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली.
अपहरणकर्ता पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये आला होता. त्याने दाढी केली होती आणि जीन्स - शर्ट घातला होता. पांढऱ्या सिडान कारमध्ये तो आला होता,अशी महिती मदत करणाऱ्या मुलाने पोलिसांना दिली आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी स्थानिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून त्यांना सुगावा मिळाला आहे.
आम्ही स्थानिक सीसीटीव्ही चेक केले आहे. वाहनाची ओळख पटली, परंतु त्याची लायसन्स प्लेट बनावट होती. फुटेजमध्ये अज्ञात व्यक्तीचा चेहरा झाकलेला आहे. आम्ही आरोपींना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे.