एक्स्प्लोर

Pune News: इसिसचा दहशतवादी रिझवान अलीची पुणे एटीएसकडून चौकशी, गरोदर पत्नी गायब

Pune News: रिझवान आणि अन्य दोन दहशतवादी मोस्ट वॉन्टेड यादीत होते. त्यापैकी एक शाहनवाज याला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती, तर अब्दुल्ला उर्फ ​​डायपरवाला अद्याप फरार आहे.

Pune News: दिल्ली पोलिसांनी इसिसचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान अब्दुल अली (ISIS terrorist Rizwan Ali) 9 ऑगस्टला अटक केली आहे. रिझवान (ISIS terrorist Rizwan Ali) हा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मोस्ट वाँटेड यादीत होता. रिझवानवरती तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस ठेवण्यात आले होते. रिझवान (ISIS terrorist Rizwan Ali) हा पुणे ISIS मॉड्यूलशी संबंधित होता. आयएसआयएसशी संबंधित दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल रिझवानवरती तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या रिझवान अलीची (ISIS terrorist Rizwan Ali) चौकशी आता पुणे दहशतवाद विरोधी पथक करणार आहे. 

रिझवान अली (ISIS terrorist Rizwan Ali) याला काहीच दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली होती. रिझवान अली हा पुणे इसिस मॉडेलशी संबंधित वॉन्टेड दहशतवादी आहे. रिझवान अली आणि शाहनवाज आलम हे दोघे ही त्यांच्या पत्नीसह पुण्यात वास्तव्यास होते. रिझवान अली (ISIS terrorist Rizwan Ali) याची पत्नी गरोदर असल्यामुळे तो उपचारासाठी तिला दिल्लीला घेऊन गेला होता. या दोघांच्या पत्नींचा शोध पुणे दहशतवाद विरोधी पथकाकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे आयएसआयएस मॉड्यूलमध्ये मुख्य भूमिकेसाठी रिझवानवर अधिकाऱ्यांनी 3 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. याशिवाय अन्य दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग तपासला जात आहे.

9 ऑगस्टला (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास दिल्ली-फरिदाबाद सीमेवरून रिझवानला शस्त्रास्त्रांसह पकडण्यात आले होते. UAPA अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून रिझवानचे (ISIS terrorist Rizwan Ali) नेटवर्क नष्ट करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. रिझवान आणि अन्य दोन दहशतवादी मोस्ट वॉन्टेड यादीत होते. त्यापैकी एक शाहनवाज याला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती, तर अब्दुल्ला उर्फ ​​डायपरवाला अद्याप फरार आहे.

एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत रिझवानचा समावेश

एनआयएच्या (NIA) मोस्ट वाँटेड यादीत दहशतवादी रिजवान अलीचा समावेश होता. पुणे ISIS मॉड्यूलच्या अनेक सदस्यांना पुणे पोलिस आणि NIA ने यापूर्वी अटक केली होती. या वर्षी मार्चमध्ये दहशतवाद विरोधी एजन्सीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात रिझवानच्या नावासह अन्य तीन आरोपींचाही समावेश होता. एनआयएने पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात एकूण 11 आरोपींवर आरोप ठेवले आहेत. हे प्रकरण पुण्यातील महाराष्ट्रातील ISIS शी संबंधित शस्त्रे, स्फोटके, रसायने आणि साहित्य जप्त करण्याशी संबंधित आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला 15 ऑगस्टपूर्वी मोठे यश

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलला 15 ऑगस्टपूर्वी मोठे यश मिळालं. दिल्ली पोलिसांनी ISIS मॉड्यूलच्या दहशतवाद्याला अटक केली. रिझवान असे या दहशतवाद्याचे नाव आहे. रिझवान हा दिल्लीतील दर्यागंजचा रहिवासी आहे. पुणे पोलिसांच्या (Pune Police) तावडीतून तो पळून गेल्यापासून तो लपलेला होता. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) शुक्रवारी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
Nashik Crime : हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Nagpur Reshim Bagh :  पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरातील रेशीम बागेत, डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीला केलं अभिवादनPM Narendra Modi Nagpur :  मोदी नागपुरातील रेशीम बागेत, डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीला अभिवादनPM Narendra Modi Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात, संघ मुख्यालयात लावणार हजेरीABP Majha Marathi News Headlines 08AM TOP Headlines 08AM 30 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
Nashik Crime : हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Embed widget