PCMC Crime News : दोन तरुणांना स्टंटबाजी करणं भोवलं निगडी मधील दोन तरूणांना अटक; कार देखील जप्त
पिंपरी-चिंचवडमधील एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या दोन स्टंटबाजला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दो बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून कारदेखील जप्त केली आहे.
पिंपरी- चिंचवड, पुणे : पिंपरी-चिंचवडमधील एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या (PCMC News) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (viral Video) झाला होता. धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून हा तरुण स्टंटबाजी करताना व्हिडिओमध्ये दिसल होता. या दोन स्टंटबाजला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दो बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून कारदेखील जप्त केली आहे.
भरधाव कारचा छतावर बसून स्टंटबाजी करणे दोन तरुणांच्या चांगला महागात पडलंय या स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्या तरुणांचा तातडीने शोध घेत दोन तरुणांना अटक केली. प्रतीक शिंगटे आणि ओमकार मुंडे अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.या दोघांवरही भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची कारही जप्त करण्यात आले आहे.
व्हिडीओ व्हायरल झाला अन् पोलिसांनी गाठला...
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. जीवावर बेतेल अशा पद्धतीने धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून तरुण स्टंटबाजी करतो आहे. हा व्हिडीओ पिंपरी- चिंचवड शहरातील असून तरुणावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या व्हिडीओत अत्यंत बिनधास्तपणे हा तरुण गाडीच्या टपावर बसलेला दिसत होता. त्याला त्याला कुठलीच भीती नाही, असं व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. या व्हिडिओच्या आधारे तरुणाचा शोध घेऊन त्यावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी माहिती दिली होती. अशा पद्धतीने कोणीही स्टंटबाजी करू नये असं आवाहन ही पोलिसांनी केलं होतं. अखेर त्यांना गाठून पोलिसांनी अटक केली.
स्वघोषित स्टंटबाजांवर पोलिसांची करडी नजर
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यात व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करताना दिसतात. पुण्यातच नाही तर सध्या सगळीकडे सोशल मीडियावर ट्रेन्ड होण्यासाठी व्हायरल होण्यासाठी तरुण वेगवेगळे स्टंट करुन व्हिडीओ काढताना दिसतात. व्हिडीओ काढायचे रिल्स तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट करायचे आणि त्यातून पैसे कमवायचे असा अनेकांचा प्लॅन दिसतो. मात्र यात अनेकांच्या जीवालादेखील धोका निर्माण होण्याची शक्यता असते. कधी कारमध्ये तर कधी बाईकरुन असे रिल्स तयार केल्याचं दिसतं. आता अशाच रिल्सवर कारवाई होणार आहे. या रिल्समुळे जीव जाण्याचीदेखील शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी आता या रिलस्टार किंवा स्वघोषित स्टंटबाजांवर करडी नजर असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-