एक्स्प्लोर

Swachh Survekshan : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सासवड आणि लोणावळा नगरपरिषदेची बाजी, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव

देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदांनी सर्वोच्च कामगिरी केली आहे. सासवड आणि लोणावळा नगरपरिषदेचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. 

पुणे: गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकारतर्फे (MoHUA) तर्फे देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ (Swachh Survekshan 2023) चा निकाल नुकताच जाहीर झाला असून  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील नगरपरिषदांनी सलग दुसऱ्यांदा देशपातळीवर सर्वोच्च कामगिरी केली आहे. यामध्ये सासवड आणि लोणावळा नगरपरिषदांचा (Lonavla Municipal Councils) पहिल्या तीन क्रमांकांच्या पुरस्कारांमध्ये समावेश आहे.

सासवड आणि लोणावळा नगरपरिषदेस एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येच्या वर्गवारीमध्ये पुरस्कार प्राप्त झाला असून 11 जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते या नगरपरिषदांना गौरविण्यात येणार आहे.

माझी वसुंधरा 4.0 मध्ये राज्यपातळीवर सर्वोत्कृष्ट जिल्हा व सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी असा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर कामगिरीमध्ये सातत्य राखून जिल्ह्याने  स्वच्छ सर्वेक्षण क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रथम तीन क्रमांकामध्ये येण्यासाठी आठ ते दहा शहरांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. यामध्ये बारामती, इंदापूर, जेजुरी, शिरुर, भोर, सासवड, लोणावळा यांचा समावेश असून यापैकी प्रत्येक नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत यापूर्वी विविध गटामध्ये राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त केलेले आहेत.

सासवड नगरपरिषदेने या स्पर्धेकरिता जय्यत तयारी केली होती. त्याअंतर्गत घनकचऱ्यावर 100 टक्के प्रक्रिया, 40 ते 50 टक्के सांडपाण्याचा पुर्नवापर, शहर सौंदर्यीकरणांतर्गत शहरात 18 ठिकाणी विविध शिल्पांची उभारणी, प्लॅस्टीकचा रस्त्यांच्या कामासाठी पुर्नवापर, बांधकाम व इतर साहित्यांची योग्य विल्हेवाटीची व्यवस्था केली असून टाकाऊ वस्तू पासून विविध शिल्प आकारलेले ‘वेस्ट टू वंडर पार्क’ आकारले आहे. शहराला थ्री स्टार व वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे.

लोणावळा नगरपरिषदेनेही सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी पूर्ण कार्यक्षमतेने सुरू केला. घनकचऱ्यावर 100 टक्के प्रक्रिया, शहरातील 40 ते 50 सांडपाण्याचा पुर्नवापर, शहरात रिड्यूस, रियूज, रिसायकल (आरआरआर) केंद्राची स्थापना करुन 2 टन इतक्या वस्तू 1 हजार 100 पेक्षा जास्त लोकांकडून जमा केल्या व त्यातील 1.5 टन वस्तू गरजू लोकांना देण्यात आल्या.

गेल्या वर्षीदेखील जिल्ह्यातील लोणावळा, सासवड, बारामती आणि इंदापूर शहरांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले होते. 

डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत लोणावळा आणि सासवड नगरपरिषदेने विशेष मेहनत घेऊन नाविन्यपूर्ण कल्पना राबविल्यामुळे तसेच नागरिकांना सहभागी करुन घेतल्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील अन्य नगरपरिषदाही आगामी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी करत आहेत.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
Radhakrishna Vikhe Patil : हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा
हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा
VC Janardan Rao : 500 कोटींच्या संपत्तीचा वाद, तुम्ही वाटणी बरोबर केली नाही म्हणत अमेरिकेत शिकलेल्या नातवाचे चाकूने 86 वर्षीय उद्योजक आजोबांवर तब्बल 70 वार
500 कोटींच्या संपत्तीचा वाद, तुम्ही वाटणी बरोबर केली नाही म्हणत अमेरिकेत शिकलेल्या नातवाचे चाकूने 86 वर्षीय उद्योजक आजोबांवर तब्बल 70 वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सUday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रियाDevendra Fadnavis  : आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
Radhakrishna Vikhe Patil : हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा
हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा
VC Janardan Rao : 500 कोटींच्या संपत्तीचा वाद, तुम्ही वाटणी बरोबर केली नाही म्हणत अमेरिकेत शिकलेल्या नातवाचे चाकूने 86 वर्षीय उद्योजक आजोबांवर तब्बल 70 वार
500 कोटींच्या संपत्तीचा वाद, तुम्ही वाटणी बरोबर केली नाही म्हणत अमेरिकेत शिकलेल्या नातवाचे चाकूने 86 वर्षीय उद्योजक आजोबांवर तब्बल 70 वार
कोल्हापूरसह राज्यात जिल्हा परिषदेत माजी सैनिकांसाठी आरक्षित जागांवर नियमबाह्य भरती; मेडल्स परत करत आंदोलन
कोल्हापूरसह राज्यात जिल्हा परिषदेत माजी सैनिकांसाठी आरक्षित जागांवर नियमबाह्य भरती; मेडल्स परत करत आंदोलन
एकीकडे राज-फडणवीस भेट; दुसरीकडे मिलिंद नार्वेकरांसह ठाकरेंच्या शिवसेना 3 बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
एकीकडे राज-फडणवीस भेट; दुसरीकडे मिलिंद नार्वेकरांसह ठाकरेंच्या शिवसेना 3 बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Nashik Crime : अनंत कान्हेरे मैदानावर भरदिवसा 19 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला, अवघ्या काही तासात हल्ल्याचा उलगडा
अनंत कान्हेरे मैदानावर भरदिवसा 19 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला, अवघ्या काही तासात हल्ल्याचा उलगडा
एकनाथ शिंदेंच्या वाढदिनी राज्यात उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा; मंगेश चिवटेंकडे जबाबदारी
एकनाथ शिंदेंच्या वाढदिनी राज्यात उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा; मंगेश चिवटेंकडे जबाबदारी
Embed widget