एक्स्प्लोर
Shirish Maharaj Death: शिरीष महाराज मोरेंनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेलं 32 लाखांचं कर्ज एकनाथ शिंदेंनी फेडलं
Shirish Maharaj Suicide: संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी पुण्यातील देहू येथे निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कर्जाच्या ओझ्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.

Eknath Shinde & Shirish Maharaj
1/9

संत तुकाराम महाराजांचे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांनी काही दिवसांपूर्वी देहू येथील निवासस्थानी आत्महत्या केली होती. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला होता. त्यांच्या डोक्यावर तब्बल 32 लाख रुपयांचे कर्ज होते.
2/9

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचं ओझं कमी केलं आहे. संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण करणाऱ्या शिरीष महाराजांसाठी एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचललं आहे.
3/9

शिरीष महाराज मोरे यांनी सुसाईड नोटमध्ये कोणाला किती पैसे द्यायचे आहेत, याचा हिशेब लिहून ठेवला होता.
4/9

आमदार विजय शिवतारेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना शिंदेंनी पाठवलेली 32 लाखांची रक्कम देऊ केली.
5/9

image 2
6/9

एकनाथ शिंदे यांनी 32 लाख रुपयांची आर्थिक मदत दिल्याने शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
7/9

कोरोनाच्या आधी शिरीष महाराज मोरे व्यवसाय क्षेत्रात उतरले होते. कागदी पिशवी बनवणे अन् त्यावर छपाई करुन देण्याचा व्यवसाय सुरु केला. यासाठी त्यांनी कर्ज उचलले होते. मात्र कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला अन् महाराजांना पहिलं आर्थिक नुकसान झेलावं लागलं.
8/9

अडीच वर्षांपूर्वी हॉटेल क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं. नादब्रह्म ईडलीची काही लाख रुपये मोजून फ्रेंचायजी घेतली. पिंपरी चिंचवड परिसरात हा नवा व्यवसाय सुरु केला, जो आज ही सुरु आहे. आधीचं कर्ज असताना पुन्हा या व्यवसायासाठी ही महाराजांनी कर्ज घेतलं.
9/9

शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम यांचे 11 वे वंशज होते.
Published at : 10 Feb 2025 11:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
ठाणे
हिंगोली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion