Solapur News : सोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव! मृत कावळ्यांचा रिपोर्ट समोर; प्रशासनान अलर्ट मोडवर, नागरिकांना आवाहन
Solapur News : सोलापूर शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे. दरम्यान मागील काही दिवसात अचानक मृत पावलेल्या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Solapur News : सोलापूर शहरात बर्ड फ्लूचा (Bird Flu) शिरकाव झाल्याने सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे. दरम्यान मागील काही दिवसात अचानक मृत पावलेल्या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भोपाळ येथील लॅबमधून मृत कावळ्यांचे रिपोर्ट हे बर्ड फ्लू पॉसिटीव्ह आढळल्याने सोलापूर महापालिका आणि पशुसंवर्धन विभाग अँक्शन मोडवर आले आहे.
सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, श्री सिध्देश्वर महाराज तलाव, खंदक बाग या परिसरात मागील काही दिवसात पन्नासहून अधिक कावळ्यांचा मृत्यू झालाय. या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाल्याचे आता स्पष्ट झाल्याने मृत कावळे आढळून आलेले परिसर निर्जंतकीकरणाला सुरुवात झाली आहे. तसेच मृत कावळे आढळून आलेले परिसर हे नागरिक फिरण्याचे परिसर असल्याने खबरदारी म्हणून 21 दिवस बंद केले जाणार असल्याची ही माहिती पुढे आली आहे. तर 1 किलोमीटर परिसरातील चिकन शॉप्समधील कोंबड्याची देखील तपासणी होणार आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत 1 किलोमीटर परिसरातील आजारी नागरिकांची देखील माहिती घेतली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र अद्याप कोंबड्यात आणि माणसामध्ये कोणत्याही पद्धतीने बर्ड फ्लूचा शिरकाव झालेलं नाही, त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन प्रशासनाने केलं आहे.
बर्ड फ्लू म्हणजे काय? कितपत धोकादायक?
बर्ड फ्लूला एव्हियन इन्फ्लूएन्झा म्हणूनही ओळखले जाते. हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो केवळ पक्ष्यांनाच संक्रमित करत नाही तर हा विषाणू मानव आणि इतर प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो. यातील बहुतेक विषाणू पक्ष्यांपर्यंतच मर्यादित असले तरी पक्ष्य्यांसाठी हा रोग प्राणघातक आहे. या रोगाचे विविध प्रकार आहेत.H5N1 मध्ये दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता आहे. H5N1 ची लागण झालेले पक्षी 10 दिवसांपर्यंत विष्ठा आणि लाळेत विषाणूच्या रूपात सोडत राहतात. दूषित क्षेत्राच्या संपर्कात आल्याने संसर्ग पसरू शकतो. दरम्यान, सतत स्थलांतर करणाऱ्या पक्षांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याने याचा धोकाही अधिक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























