Yuvraj Singh :6,6,6,6,6,6,6... युवराज सिंगनं षटकारांचा पाऊस पाडला, मास्टर्स लीगच्या उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवलं
Yuvraj Singh : भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग यानं आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार फलंदाजी केली. यामध्ये त्यानं 7 षटकार मारले.

रायपूर : भारतात सध्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग सुरु आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत नसलेले खेळाडू सध्या या स्पर्धेत खेळत आहेत. भारतानं आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये ऑस्ट्रेलियाला 94 धावांनी पराभूत केलं. या विजयानंतर भारत अंतिम फेरीत पोहोचला आहे. रायपूरमध्ये झालेल्या मॅचमध्ये भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटवर 220 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा संघ 18.1 ओव्हरमध्ये 126 धावांवर बाद झाला.
भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटवर 220 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियापुढं 221 धावांचं आव्हान होतं. भारताला या धावसंख्येंपर्यंत पोहोचवण्यामध्ये युवराज सिंगनं महत्त्वाची भूमिका बजावली. युवराज सिंगनं त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली होती. त्याच प्रकारे ऑस्ट्रेलिया मास्टर्स टीम विरोधात कारवाई केली. युवराज सिंगनं त्याच्या डावात सात षटकार मारले.
युवराज सिंगनं 30 बॉलमध्ये 7 षटकार अन् एक चौकार मारत 59 धावांची खेली केली. यामुळं भारतानं 200 धावांचा टप्पा पार केला. यापूर्वी भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. अंबाती रायडू 5 धावा करुन बाद झाला. पवन नेगीनं 14 धावा केल्या. इंडिया मास्टर्सचा कॅप्टन सचिन तेंडुलकरनं 30 बॉलमध्ये 42 धावा केल्या. स्टूअर्ट बिन्नीनं 36 तर यूसुफ पठाणनं 23 धावा केल्या.
आस्ट्रेलियावर 94 धावांनी विजय
भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलिया मास्टर्सचे फलंदाज नियमित अंतरानं बाद होत गेले. शेन वॅटसन 5 धावांवर बाद झाला. शॉन मार्श आणि बेन डंक यांनी प्रत्येकी 21-21 धावा केल्या डॅनियल 2 धावांवर माघारी परतला. नाथन रेडर्न 21 धावा करु शकला. नाथनजीरो स्टीव ओकीफ शुन्यावर बाद झाला. बेन कटिंगनं 39 धावांवर बाद झाला. भारताकडून शहबाज नदीमनं 4, इरफान पठाण आणि विनय कुमार यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
दरम्यान, भारतानं आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. श्रीलंका मास्टर्स आणि वेस्ट इंडिज मास्टर्स यांच्यात आज सामना होईल. यामध्ये जो संघ विजय मिळवेल. त्यांच्या विरुद्ध भारत मास्टर्स संघाचा सामना होईल.
𝐘𝐮𝐯𝐫𝐚𝐣'𝐬 𝐬𝐢𝐱-𝐬𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 5️⃣0️⃣! 💪
— INTERNATIONAL MASTERS LEAGUE (@imlt20official) March 13, 2025
His powerful display leads him to a remarkable half-century! ⚡🙌
Watch the action LIVE ➡ on @JioHotstar, @Colors_Cineplex & @CCSuperhits! #IMLT20 #TheBaapsOfCricket #IMLonJioHotstar #IMLonCineplex pic.twitter.com/QhJRdyh4zu
इतर बातम्या :
जन्माने परदेशी 4 क्रिकेटपटू, एक तर शिकायला भारतात आला, टीम इंडियाचा कणाच बनला!





















