एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana: पिंपरी-चिंचवडमधील तब्बल 'एवढ्या' महिल्या लाडकी बहीण योजनेतून ठरल्या अपात्र, काय आहे कारण?

Ladki Bahin Yojana: महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील पक्षांना भरभरून मतदान केल्याचं बोललं जातंय.

पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) गेमचेंजर ठरली. त्यानंतर आता निवडणुकीआधी देण्यात आलेल्या आश्वासनानुसार आता राज्यातील लाडक्या बहिणींना या योजनेच्या अंतर्गत रक्कम वाढवून मिळणार का अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान या योजनेला पिंपरी-चिंववड शहरातून देखील चांगलाच प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंववडमधून तब्बल 4 लाख 32 हजार 890  अर्ज लाडक्या बहिणींनी भरले होते. त्यापैकी 3 लाख 89 हजार 920 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या. त्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम त्यांना मिळाली आहे. तर, 42 हजार 486 अर्ज बाद ठरण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेसाठी तब्बल 4 लाख 32 हजार 980 अर्ज भरण्यात आले होते. महिलांनी महापालिका केंद्र, ऑनलाईन,नागरी सुविधा केंद्र, अंगणवाडी सेविका या माध्यमातून अर्ज भरले होते. हे अर्ज 30 सप्टेंबर 2024 पर्यंत स्वीकारण्यात आले. त्यानंतर अर्ज करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली. मिळालेल्या अर्जांपैकी 3 लाख 89 हजार 920 अर्ज वैध ठरले. तर, 42 हजार 486 अर्ज बाद ठरण्यात आले आहेत. वैध ठरलेल्या अनेक लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला. योजनेतून मिळणारी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. 

कोणत्या कारणांनी अर्ज ठरले बाद

अवैध ठरलेल्या अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे नसणं, पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील, मर्यादेपेक्षा उत्पन्न जास्त, एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांचे अर्ज, मुदतीमध्ये अर्ज प्राप्त न होणे आदी कारणांमुळे हे अर्ज बाद ठरण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर

विधानसभा निवडणुकीच्या आधी काही महिने महायुती सरकारकडून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेत पात्र ठरणार्‍या महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. सरकारकडून ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील पक्षांना भरभरून मतदान केल्याचं बोललं जातंय. (Ladki Bahin Yojana) 

महिलांना मिळणार 2100 रुपये

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. काल 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी पार पडला. त्यानंतर मंत्रालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाढीव हप्ता कधी मिळणार? अशी विचारणा करण्यात आली. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहेत. तसेच महिलांना मिळणारा लाभ 2100 रुपये करणार आहोत. आता अर्थसंकल्पाच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू. शेवटी आपले आर्थिक योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thailand, Bangkok, Earthquake : अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, शक्तीशाली भूकंपाने बँकाॅकमध्ये हाहाकार
Video : अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, शक्तीशाली भूकंपाने बँकाॅकमध्ये हाहाकार
कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद
कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद
Mumbai Couple Crime Bengaluru: एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं, लग्नासाठी जगाशी दोन हात केले, पण बंगळुरुत राकेश-गौरीच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत
एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं, लग्नासाठी जगाशी दोन हात केले, पण बंगळुरुत राकेश-गौरीच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत
Ajit Pawar : बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही, बाकीच्यांचा घास नाही घास....; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही, बाकीच्यांचा घास नाही घास....; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Attack News : कोल्हापूर कोर्टात वकिलाकडून प्रशांत कोरटकरवर हल्ला, सुनावणीनंतर कोरटकरला कोठडीकडे नेताना हल्लाPrashant Koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकरला न्यायालयाचा झटका, आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडीत वाढABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 AM 28 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 AM 28 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thailand, Bangkok, Earthquake : अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, शक्तीशाली भूकंपाने बँकाॅकमध्ये हाहाकार
Video : अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, शक्तीशाली भूकंपाने बँकाॅकमध्ये हाहाकार
कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद
कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद
Mumbai Couple Crime Bengaluru: एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं, लग्नासाठी जगाशी दोन हात केले, पण बंगळुरुत राकेश-गौरीच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत
एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं, लग्नासाठी जगाशी दोन हात केले, पण बंगळुरुत राकेश-गौरीच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत
Ajit Pawar : बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही, बाकीच्यांचा घास नाही घास....; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही, बाकीच्यांचा घास नाही घास....; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
Video: कोल्हापूर कोर्टात अखेर हाणामारी झालीच; वकिलाचाच प्रशांत कोरटकरवर हल्ला; व्हिडिओ समोर
Video: कोल्हापूर कोर्टात अखेर हाणामारी झालीच; वकिलाचाच प्रशांत कोरटकरवर हल्ला; व्हिडिओ समोर
Earthquake, Myanmar, Bangkok : म्यानमार शक्तीशाली भूकंपाने हादरला, बँकाॅकपर्यंत धक्क जाणवले; अनेक इमारती उभ्याउभ्या पत्त्यासारख्या कोसळल्या
Video : म्यानमार शक्तीशाली भूकंपाने हादरला, बँकाॅकपर्यंत धक्क जाणवले; अनेक इमारती उभ्याउभ्या पत्त्यासारख्या कोसळल्या
दोघांत तिसरा, आता नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडेच? रायगडचा वाद वेगळ्या वळणावर, महायुतीत नेमकं चाललंय काय?
दोघांत तिसरा, आता नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडेच? रायगडचा वाद वेगळ्या वळणावर, महायुतीत नेमकं चाललंय काय?
मोठी बातमी! बायकोला संपवणाऱ्या राजेशनेही झुरळ मारण्याचं औषध प्यायलं; रुग्णालयात उपचार सुरू
मोठी बातमी! बायकोला संपवणाऱ्या राजेशनेही झुरळ मारण्याचं औषध प्यायलं; रुग्णालयात उपचार सुरू
Embed widget