Sanjay Raut : नीलम गोर्हे निर्लज्ज, नमकहराम बाई, 'मर्सिडीज'च्या वक्तव्यावरून संजय राऊतांची आगपाखड; म्हणाले, त्या बाईचं विधान परिषदेतलं कर्तृत्व काय?
Sanjay Raut on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप केला. यावरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

Sanjay Raut on Neelam Gorhe : 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप केला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, निलम गोऱ्हे ही निर्लज्ज, नमकहराम बाई आहे. नीलम गोऱ्हे यांचे कालचे जे वक्तव्य आहे ती त्यांची विकृती आहे. त्यांनी काय विधान केलं. ज्या घरात तुम्ही खाल्ले, चार वेळा आमदार झालात. मला आठवत आहे की, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ही कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये? हे कुठलं ध्यान आपल्या पक्षात आणलेलं आहे. ही आपल्याला आयुष्यभर शिव्या घालणार, असे त्यांनी म्हटले होते. तरी काही लोकांच्या मर्जी खातीर त्या आल्या आणि गेल्या. चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. त्या बाईचं विधान परिषदेतलं कर्तृत्व काय? हे जर समजून घ्यायचं असेल तर पुणे महानगरपालिकेमध्ये अशोक हरनाळ नावाचे आमचे गटनेते होते. पुण्याचा प्लॅनिंग डीपी सुरू होता तेव्हा त्यांना धमक्या देऊन या बाईंनी कोणा कोणाच्या नावावर कोट्यावधी रुपये गोळा केले. त्यांची मुलाखत घ्या. मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे हे त्यांना कळेल.
मराठी साहित्य महामंडळाने माफी मागायला पाहिजे
नाशिकच्या विनायक पांडेंना उमेदवारी देण्यासाठी या बाईने किती पैसे घेतले होते? हे विनायक पांडेंना जाऊन विचारा. विनायक पांडेंनी त्या बाईकडून पैसे कसे वसूल केले? हे विनायक पांडे आणि अशोक हरनाळ यांची मुलाखत घेतल्यावर समजेल. अजून तुम्हाला दोन दिवसात आणखी नावे देईन. तुम्ही कोणावर थुंकत आहात मातोश्रीवर? काय तुमचे कर्तृत्व होते? तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलेले नाही. अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाहीत. एक संस्कार, संस्कृती असते. तुम्ही मातोश्रीच्या बाबतीत अशा प्रकारचे विधाने करतात. ज्यांनी तुम्हाला कारवाईला आमदार केले, उपसभापती केले. मराठी साहित्य महामंडळाने माफी मागायला पाहिजे. उषा तांबे वगैरे कोण आहे ते मला माहित नाही. त्यांचे साहित्यातले योगदान मला माहित नाही. आतापर्यंत आम्ही या विषयावर कधी बोललो नव्हतो. साहित्य आम्हाला कळते, आम्ही लिहिणारे माणसं आहोत.
माझ्यावर दहा हक्कभंग आणा
तुम्ही निर्लज्ज, नमकहराम शब्द वापरला, त्या महिला आहेत आणि उपसभापती असून तुमच्यावर हक्कभंगाची कारवाई होऊ शकते. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, माझ्यावर दहा हक्कभंग आणा. मी नीलम गोऱ्हेबद्दल बोललेलो आहे. काल ती उपसभापती म्हणून उद्धव साहेबांविषयी बोलली का? मला तुम्ही नियम सांगू नका. मी 24 वर्षापासून राज्यसभेत आहे. मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहित आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवर हक्कभंग आणला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
नीलम गोऱ्हे सभागृहात लक्षवेधी लावायला पैसे घेतात
संजय राऊत पुढे म्हणाले की, नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मी उषा तांबे यांना साहित्य संमेलनात माझा कार्यक्रम लावण्यासाठी 50 लाख रुपये दिले. मग त्या मर्सिडीजही देऊ शकतात. नीलम गोऱ्हे सभागृहात लक्षवेधी लावण्यासाठी आणि प्रश्न विचारायला देण्यासाठी किती पैसे घेतात, याची माहिती माझ्याकडे आहे. या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असे दावा देखील त्यांनी केलाय. साहित्य संमेलनात जी राजकीय चिखलफेक झालीय, त्याची जबाबदारी शरद पवारसाहेबही झिडकारु शकत नाहीत, ते स्वागताध्यक्ष होते, पालक आहेत, जी राजकीय चिखलफेक झाली, ते सुद्धा तितकेच जबाबदार, पवारसाहेबांनी निषेध व्यक्त केला पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
