लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
बारामती हा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. लोकसभा निवडणुकीत तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम केला, असे विधान अजित पवार म्हणाले.
पुणे : बारामती या मतदारसंघात युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) अशी थेट लढत होत आहे. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उभं केलं आहे. त्यामुळे बारामती मंतदारसंघ सध्याच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रस्थानी आला आहे. युगेंद्र पवार यांना विजयी करण्यासाठी शरद पवार यांनी आपली पूर्ण ताकद उभी केली आहे. त्यामुळेच अजित पवार हेदेखील यावेळी बारामतीकडे विशेष लक्ष देत आहेत. दरम्यान, बारामतीतील एका गावात बोलताना अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत खदखद व्यक्त केली. जयंत पाटलांच्या भाषेत बोलायचे झाल्यास तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम केला, असं अजित पवार म्हणाले.
लोकसभेत तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम केला
तुमच्या गावात वाद आहेत. तुमच्या गावातील वादाचा फटका मला बसू देऊ नका. तुम्हाला सगळं काही मंळतं. त्यामुळे त्यामुळे तुम्हाला माझी किंमत राहिली नाही. तुम्ही लोकसभेला साहेबांचे (शरद पवार) ऐकले. साहेबांच्या वयाचा विचार करता तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम केला. आमच्या जयंत पाटलांच्या भाषेत बोलत झालं तर करेक्ट कार्यक्रम केला. आम्ही पण तो स्वीकारला, अशी खदखद अजित पवार यांनी बोलून दाखवली. तसेच आपल्याच लोकांनी कार्यक्रम केला तर न स्वीकारून कोणाला सांगता? आमच्याच लोकांनी बटणे दाबली. बाहेरून तर कुणी आलं नव्हतं. आम्ही पण ते स्वीकारले, असंही अजित पवार पुढे बोलताना म्हणाले.
गटबाजी करून माझी वाट लावू नका
पुढे बोलताना अजित पवार कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना चांगली कामं करा. जर काम खराब झालं, तर मलिदा गँग म्हटलं जातं. त्यातून माझी बदनामी होते. माझ्याकडे बघून निवडणुकीत भाग घ्या. तुमच्याकडे गटबाजी करू नका. गटबाजी करून माझी वाट लावू नका, असा सवाल अजित पवार यांनी दिला.
मोरच्यांच्या भूलथापांना बळी पडू नका
लाडकी बहीण योजनेवरही अजित पवार यांनी यावेळी भाष्य केलं. तुम्हाला पंधराशे रुपये दिले. पण महागाई किती वाढवली, असे विरोधक विचारतात. समोरच्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. ते तुम्हाला स्वप्न दाखवण्याचे काम करत आहेत. ते स्वप्न कधीही अस्तित्वात येऊ शकत नाहीत. गेल्या निवडणुकीत तुम्ही एक नंबरची मतं दिली, मी सगळ्यात जास्त निधी आणला. तुम्ही जेवढी मतं द्याल तेवढा निधी आणेल, असे आश्वासनही अजित पवार यांनी बारामतीच्या जनतेला दिले.
....आता मला खुश करायला मतदान करा
गावातल्या नाराजीचा फटका मला बसू देऊ नका एवढेच करा. लोकसभा निवडणुकीला तुम्ही जसं ताईला खुश करण्याकरता मतदान केलं, साहेबांना खुश करण्याकरता मतदान केलं, तसं आता मला खुश करायला मतदान करा, असं आवाहनही अजित पवार यांनी मतदारांना केलं.
हेही वाचा :