एक्स्प्लोर

मोठी बातमी : प्रचार सुरु केलेल्या चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरेंचा फोन, सांगलीच्या उमेदवारीवर मोठं भाष्य

Maha Vikas Aghadi : सांगलीच्या जागेवरून अद्याप निर्णय झाला नसताना या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील निवडणूक लढवतील अशी घोषणा आधीच करण्यात आली आहे. 

सांगली: आपल्या उमेदवारीबद्दल आजिबात धाकधूक नाही, उमेदवारी फिक्स असल्याचं सांगत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी (Chandrahar Patil) त्यांना उद्धव ठाकरे यांचा फोन आल्याचं सांगितलं. 21 मार्च रोजी मिरजेत होणाऱ्या सभेवर उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली असल्याचंही चंद्रहार पाटलांनी सांगितलं. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi Seat Sharing) काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. 

वरिष्ठ पातळीवर काय सुरू आहे याची मला कल्पना नाही, पण माझी उमेदवारी फिक्स आहे असा विश्वास चंद्रहार पाटलांनी व्यक्त केला. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी आपण प्रचार सुरू केल्याचंही ते म्हणाले.

चंद्रहार पाटील म्हणाले की, माझ्या उमेदवारीबाबत आता मला अजिबात धाकधूक वाटत नाही. माझी उमेदवारी 'मातोश्री'मधून फायनल झाली आहे. वरिष्ठ पातळीवर आता काय चर्चा चालू आहे याची मला कल्पना नाही सोमवारी रात्रीच उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. 21 मार्च  रोजी मिरजेत होणाऱ्या सभेबाबत चर्चा झाली. आम्ही सभेच्या तयारीला लागलोय. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करणार. जो उमेदवार असेल त्याच्या मागे उभे राहण्याचा निर्णय झाला आहे. 

सांगलीवरून ठाकरे आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच

सांगली लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसनेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. या आधी शिवसेनेच्या कोल्हापूची जागा ही शाहू महाराजांसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापुरातून शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेना लढवणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं होतं. 

संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर सांगलीतील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. या ठिकाणाहून विशाल पाटील यांनी तयारी केली होती. त्यामुळे काहीही झालं तरी सांगलीची जागा ही काँग्रेसकडेच राहावी, त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल अशी भूमिका काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी घेतली आहे. 

चंद्रहार पाटलांची उमेदवारी 'मातोश्री'वरून जाहीर

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसला तरी उद्धव ठाकरे यांनी या आधीच सांगलीतून चंद्रहार पाटील हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवतील असं जाहीर केलं. त्यामुळे सांगलीतील काँग्रेस नेत्याची धाकधूकही वाढल्याचं दिसून आलं.

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातोय. पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये या ठिकाणी भाजपचे संजयकाका पाटील यांनी बाजी मारली. आताही भाजपने त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
Embed widget