एक्स्प्लोर

Ajit Pawar: चुकीची माणसं असतील तर बाजूला करावं लागतं...; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचं मोठं विधान

Walmik Karad Mcoca Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंयत आठ आरोपींवर मकोका गुन्हा दाखल आहे.

Walmik Karad Mcoca Santosh Deshmukh Murder Case: आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराड यांना मंगळवारी मोठा झटका बसला. केज सत्र न्यायालयातील वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मीक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज वाल्मिक कराडला पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंयत आठ आरोपींवर मकोका गुन्हा दाखल आहे.

वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच विरोधकांकडून सतत धनंजय मुंडेंच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. याचदरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला. यावर अजित पवार यांनी रोखठोक उत्तर दिलं. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार...कुणाकडे काही पुरावे असतील त्यांनी आम्हाला द्यावे, त्यांच्यावर आम्ही कारवाई करु, असं अजित पवार म्हणाले. मी पण शेतकरी आहे. शेतकरी म्हणूनच बोलतोय. चुकीची माणसं असतील तर बाजूला करावे लागते. आम्ही चौकशी कर...कोणालाही पाठीशी घालणार नाही, असंही अजित पवारांनी सांगितले. 

कुणाचेही धागेदोरे मिळाले, तर त्यावर कारवाई केली जाईल- अजित पवार

जे दोषी असतील जे कोणी असतील त्यांच्यावर करवाई करत आहोत. आरोपींना सरकार म्हणून आम्ही सोडणार नाही. सीआयडी, एसआयटी त्यांचं काम करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हेच सांगितले. आरोपी कुणीही असो त्यांना कुठलाही थारा दिला जाणार नाही. तिथे कडक एसपी आता आम्ही पाठवलेले आहेत. पत्रकारांना ही विनंती त्यांनी ही जाऊन बघावं एसपी तिथले कसं काम करताय.  कायदा सुव्यवस्था तिथे राखायची अशा सूचनाच त्यांना दिलेल्या आहेत. कुणाचेही धागेदोरे मिळाले, तर त्यावर कारवाई केली जाईल, असं अजित पवार यांनी सांगितले. 

बीड जिल्ह्यातील वातावरण दिवसेंदिवस तापतंय-

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मारेकऱ्यांना पकडण्यात झालेली दिरंगाई, वाल्मिक कराडला शोधण्यात पोलिसांना आलेले अपयश आणि एसआयटी पथकात कराड यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांचा असलेला समावेश अशा आरोपांमुळे बीड प्रकरणात सरकारची प्रतिमा काहीशी मलीन झाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा घेण्यासाठी महायुतीच्या गोटातूनही दबाव वाढल्याची चर्चा आहे. मात्र, तुर्तास अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना अभय दिले आहे. परंतु, यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत आहे.

संबंधित बातमी:

Walmik Karad Mcoca: वाल्मिक कराडभोवती तपासाचा फास कसा आवळला? त्या 6 फोन कॉलमुळे मकोका लागला, नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
Ajit Pawar : अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
Katrina Kaif Visited Pakistan: कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
आम्ही मरावं का? चाचांचं लग्न पाहून व्हायरल फोटोवर तरुणांचा कमेंटचा पाऊस, नव्या नवरीच्या सौंदर्याचं कौतुक! Video
आम्ही मरावं का? चाचांचं लग्न पाहून व्हायरल फोटोवर तरुणांचा कमेंटचा पाऊस, नव्या नवरीच्या सौंदर्याचं कौतुक! Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar on Anna Bansode : आण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, कौतुक करता करता गुपितच फोडलं!ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 26 March 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सAnna Bansode Vidhansabha Deputy Speaker: अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्षपदी,प्रस्ताव एकमताने समंतNagpur : नागपूरच्या हिंसाचारात दशक्रियेसाठी आलेल्या कुटुंबातील 10 जणांना अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
Ajit Pawar : अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
Katrina Kaif Visited Pakistan: कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
आम्ही मरावं का? चाचांचं लग्न पाहून व्हायरल फोटोवर तरुणांचा कमेंटचा पाऊस, नव्या नवरीच्या सौंदर्याचं कौतुक! Video
आम्ही मरावं का? चाचांचं लग्न पाहून व्हायरल फोटोवर तरुणांचा कमेंटचा पाऊस, नव्या नवरीच्या सौंदर्याचं कौतुक! Video
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
Warren Buffett : भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
Embed widget