Ajit Pawar and Eknath Shinde : अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, महाशक्तीकडून किती जागा मिळणार?
Ajit Pawar and Eknath Shinde : महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जागा वाटपाबाबत ठोस निर्णय व्हावा यासाठी पुन्हा एकदा दिल्ली गाठणार आहेत.
Ajit Pawar and Eknath Shinde : महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जागा वाटपाबाबत ठोस निर्णय व्हावा यासाठी पुन्हा एकदा दिल्ली गाठणार आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील (Pune) पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा दिल्लीला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीचा जागा वाटपाचा निर्णय दिल्लीत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी अजित पवार यांनी तिघांचा सन्मान होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
"कॅबिनेट झाल्यावर मी, एकनाथ शिंदे, फडणवीस, बावनकुळे दिल्लीत जाऊ. तिथे जागा वाटपाबाबत चर्चा होईल. त्यानंतर काय ते फायनल होईल. तिघांचा सन्मान होईल अशी पद्धतीने जागा वाटप होईल", असेही अजित पवार म्हणालेत.
कोणाला किती जागा मिळणार?
महायुतीच्या जागावाटपात भाजपकडून अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला केवळ विनींग सीट दिल्या जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपला 34 ते 35, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला 3 ते 4 तर शिंदे गटाला 12 ते 13 जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले तेव्हापासून जागा वाटपाच्या हालचालींना वेग आलाय.
जागा वाटपावरुन अजित पवार गट नाराज
महायुतीतील जागावाटपात फारच कमी जागा मिळत असल्याने अजित पवार (Ajit Pawar) गटामध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटातील अनेक नेते नाराज असून त्यांनी जागा वाढवून मिळाव्यात यासाठी वरिष्ठांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र, अजित पवार दिल्लीतील बैठकीत किती जागा मागतात आणि त्यांच्या वाट्याला किती जागा येतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
निवडणुकांचा विषय हा कोर्टात आहे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय हा कोर्टात आहे. आम्हाला तर निवडणुका पाहिजेत. याच सरकारला दोष देऊन चालणार नाही.कारण मागच्या सरकारमध्ये सुद्धा निवडणुका झाल्या नाहीत. सुप्रीम कोर्टात प्रश्न प्रलंबित आहे, त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य नाही. बारामतीचा उमेदवार त्यांनी जाहीर केला, स्वागत आहे. महायुतीचा निर्णय झाला की,आम्ही पण आमचे उमेदवार जाहीर करु, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या