नवी मुंबईतील एका घरात आढळला आई आणि मुलाचा मृतदेह; मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण; हत्या झाल्याचा संशय
Mumbai Crime : नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्ज आपार्टमेंटमध्ये दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
Mumbai Crime : नवी मुंबईतील (Mumbai Crime) कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्ज आपार्टमेंटमध्ये दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या अपार्टमेंटमध्ये एका घरात आई आणि मुलाची बॅाडी आढळून आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडालीये. दरम्यान, मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण असल्याचे हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला तेव्हा घरातील एलपिजी गॅस लिक असल्याचे आढळले होते. आता दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आल्या असून हत्या की आत्महत्या याचा तपास सुरु करण्यात आालाय. सोसायटीचे सीसीटीव्ही चेक करण्यास सुरवात करण्यात आली आहे.
पूर्ववैमनस्यातून नाशकात मुंडके छाटण्यात आल्याची खळबळजनक घटना
नाशिकच्या पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ननाशी गावच्या भरवस्तीत आज सकाळी 10:15 च्या सुमारास एकाचे मुंडके छाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आालय. पूर्ववैमनस्यातून ननाशी गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ ही घटना घडलीये. याबाबत अधिकची माहिती अशी की, गुलाब रामचंद्र वाघमारे व सुरेश बोके व विशाल बोके यांचे काही कारणावरुण गेली दोन वर्षापासून वाद होता. या वादाच्या कारणावरुण वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती. मात्र आज नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे व सुरेश बोके व विशाल बोके यांच्यांत वाद उफाळून आला. त्याचे पर्यावसान हाणामारीत होऊन सुरेश बोके , विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुऱ्हाडीने धडावेगळे केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. बोके बंधूंनी मयत वाघमारेचे मुंडके व हत्यार घेऊन सिनेस्टाईल पद्धतीने ननाशी पोलीस चौकीत घेवून आले व झाल्या प्रकाराचा खुलासा केला. खुनाच्या घटनेने ननाशीत तणावाची स्थिती असून पोलीसांची कुमक दाखल झाली आहे..
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात जाळपोळ झाल्याची घटना घडल्याने खळबळ
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात जाळपोळ झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक सूत्रांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने समोर उभ्या असलेल्या गर्दीला बाजू करण्याच्या उद्देशाने हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केली. यावेळी वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीही वाहनात असल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणाना आवरण्याचा प्रयत्न केला.मात्र अजून काही तरुण धाऊन आल्याचे नंतर दोन गट आमने सामने आल्याच्या कारणावरून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात काही दुकानांची आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची घटना नवीन वर्षाच्या प्रारंभीच घडल्याने खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या