Rajan Salvi : राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा असतानाच भाजपच्या बड्या नेत्याची सूचक प्रतिक्रिया
Rajan Salvi, मुंबई : राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार, अशी चर्चा सुरु असताना भाजप नेत्याने सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
Rajan Salvi, मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena Uddhav Thackeray) निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी (Rajan Salvi) आता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. राजन साळवी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला. मात्र, निवडणुकीत आणि निवडणुकीनंतरही पक्षाच्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्याकडून दखल घेतली जात नसल्यामुळे राजन साळवी (Rajan Salvi) हा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. याशिवाय गेल्या दोन वर्षात राजन साळवी यांच्या मागे सातत्याने तपास यंत्रणांचा ससेमिरा असल्याचेही पाहायला मिळत होते. त्यामुळे राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार की भाजपमध्ये जाणार? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, याबाबत आता भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजन साळवी चांगले कार्यकर्ते - प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर म्हणाले, राजन साळवी हे शिवसेनेचे एक चांगले कार्यकर्ते आहेत. उरलेले उभाठाचे नेते हे अस्वस्थ आहेत, असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी राजन साळवींचं कौतुक केलंय.
दरम्यान, आता ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी येत्या दोन दिवसात भूमिका मांडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला असल्याचे बोलले जात आहे. राजन साळवी हे आपल्या मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत पुढील निर्णय घेणार... परंतु स्थानिक पदाधिकारी ठाकरेंना सोडून जाण्यास तयार नाहीत. मात्र असं असताना सुद्धा राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून दोन दिवसात आपली भूमिका आपण जाहीर करत असल्याचं सांगितलं असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दोन्ही पवार एकत्र येण्याच्या अजित पवारांच्या आईच्या भूमिकेवर प्रवीण दरेकर म्हणाले, कोणत्या आईला वाटतं दोन मुलं विखुरलेली असावी. कोणत्याही माऊलीची तीच भूमिका असते त्या अर्थाने त्या बोलल्या असतील त्या भावनेतून त्यांचं हे वक्तव्य आहे. कोणतही कुटुंब एकत्र होत असेल तर त्या दुःख होण्याचं कारण नाही.
राजन साळवी दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार
पुढे बोलताना राजन साळवी म्हणाले, नवीन वर्षी महाराष्ट्र राज्य सुकालाम सुफलाम होणार आहे. देवेंद्रजींच्या सरकारच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी मोठ्या प्रमाणात काम व्हावं. मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीचा महापौर हा मुंबई महानगर पालिकेवर असणार आहे. बीडच्या प्रकरणाचा विरोधक हे राजकारण करत आहे. विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात येत आहे आणि निवडणुकीआधी देखील त्यांनी हेच केलं. एसआयटीमुळे आणखी गतीने तपास होईल आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय