एक्स्प्लोर

Nashik Loksabha : लोकसभेचं तिकीट न मिळालेले विजय करंजकर अजूनही वेटिंगवरच, उद्धव ठाकरेंशी भेट नाहीच!

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने विजय करंजकर नाराज असल्याची चर्चा आहे.

Vijay Karanjkar : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली. नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा संघटक विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी नाराजी व्यक्त केली होती. राजाभाऊ वाजेंच्या प्रचारार्थ सिन्नरमध्ये (Sinnar) झालेल्या जाहीर सभेतही करंजकर गैरहजर होते.  

नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Election 2024) उमेदवारी मिळणार असल्यामुळे विजय करंजकर यांनी वर्षभराआधीच आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत विजय करंजकरच उमेदवार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे उमेदवारी गृहित धरून करंजकर यांनी जोरदार प्रचार केला होता. 

ऐनवेळी राजाभाऊ वाजेंना उमेदवारी 

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसकडून करंजकर यांच्या नावाला विरोध झाला होता. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने ऐनवेळी करंजकर यांचा पत्ता कट करत, सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केल्याची चर्चा आहे. 

विजय करंजकर वेटिंगवरच

यानंतर विजय करंजकर यांनी लढणार आणि पाडणार, असा नारा देत शड्डू ठोकला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यांच्या नाराजीला आठ दिवस झाले आहेत. मात्र पक्षाकडून त्यांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही. त्यांना 'मातोश्री'वरूनच वेटिंगवर ठेवल्याची माहिती मिळत आहे. 

राजाभाऊ वाजेंच्या सभेला करंजकरांची पाठ

राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने सिन्नरमध्ये मंगळवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी करंजकर यांना आमंत्रणासाठी फोन केले होते. परंतु, करंजकर यांनी या नेत्यांचेही फोन घेतले नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असून मेळाव्याकडे पाठ फिरवल्यामुळे त्यांची नाराजी कायम दिसून येत आहे. 

नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच

दरम्यान, नाशिकच्या जागेवरून महायुतीत अजूनही रस्सीखेच कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारीसाठी तीन वेळा मुंबईवारी केली असली तरी नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आता महायुतीत नक्की नाशिकची जागा कुणाला सुटणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

Nashik Lok Sabha : उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Embed widget