(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Lok Sabha : उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
Rajabhau Waje : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राजाभाऊ वाजे यांना शिवसेना ठाकरे गटातून उमेदवारी जाहीर झाल्याने विजय करंजकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर राजाभाऊ वाजे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Rajabhau Waje on Vijay Karanjkar : बुधवारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (Shiv Sena UBT) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elecion) 17 उमेदवारांची यादी जाहीर केली. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा संघटक विजय करंजकर (Vijay karanjkar) हे नाशिक लोकसभेसाठी इच्छुक आहे. राजेंना उमेदवारी जाहीर झाल्याने करंजकरांनी नाराजी व्यक्त केली.
आज ठकारे गटाचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीनंतर राजाभाऊ वाजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. विजय करंजकरांची नाराजी मी स्वतः त्यांना भेटून दूर करेन, असे त्यांनी म्हटले आहे.
विजय करंजकरांची नाराजी दूर करणार
राजाभाऊ वाजे म्हणाले की, आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मी भेट घेतली. मला नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी पूर्णपणे तयारी करण्याच्या आणि लढण्याच्या सूचना मला दिल्या आहेत. विजय करंजकर यांच्यासोबत मागील अनेक वर्षांपासून मी काम करत आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन, असे त्यांनी म्हटले आहे.
आम्ही सगळे एकत्रित येऊन निवडणूक लढू
मी स्वतः विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांना भेटेल. उद्धव ठाकरेंशी देखील मी विजय करंजकर यांच्या नाराजी संदर्भात चर्चा केली. करंजकर सुद्धा उद्धव ठाकरेंना भेटायला येणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं की, तुम्ही त्यांना जाऊन भेटा. त्यामुळे आम्ही सगळे एकत्रित येऊन निवडणूक लढू. महायुतीचा उमेदवार अजून जरी जाहीर झाला नसला तरी मला वाटत नाही माझ्यासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे महायुतीचा कोणताही उमेदवार जाहीर होऊ द्या. आम्ही निवडणूक लढू, आव्हान पेलण्याची ताकद आमच्यात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सकल मराठा समाजाच्या बैठकीला विजय करंजकरांची उपस्थिती
दरम्यान विजय करंजकर यांनी आज नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीला हजेरी लावली. यानंतर विजय करंजकर म्हणाले की, काही पदाधिकाऱ्यांचे मला फोन आलेत. मी प्रत्येक बैठकीला आलो होतो. त्यामुळे आजच्या बैठकीलाही उपस्थित राहिलो. आजची कुठल्या पार्श्वभूमीवर होती, याबाबत मला माहित नव्हते. सामाजिक बांधिलकीतून या बैठकीला आलो असल्याची त्यांनी म्हटले. यामुळे आता विजय करंजकर हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून मराठा समाजाचे उमेदवार असणार का? असा चर्चांना नाशिकमध्ये उधाण आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Lok Sabha : विजय करंजकर सकल मराठा समाजाचे उमेदवार? नाशकात वाजे विरुद्ध करंजकर लढत?