एक्स्प्लोर

Nashik Accident: सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला

Nashik Accident: नाशिकमध्ये रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता.

नाशिक: नाशिकच्या द्वारका पुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृत आणि जखमींमध्ये प्रामुख्याने किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. द्वारका पुलावर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये एका टेम्पोने  लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडकली. या ट्रकमधील लोखंडी सळ्या अंगातून आरपार गेल्याने सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे द्वारका उड्डाणपुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या परिसरात तब्बल पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

प्राथमिक माहितीनुसार, लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी द्वारका उड्डाणपुलावर एक  टेम्पो मागून ट्रकला जोरात धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.  ट्रकच्या मागच्या बाजूला पोरसवदा मुलांचा एक ग्रूप होता. अपघातानंतर लोखंडी ट्रकमधील सळया यापैकी काहीजणांच्या अंगात शिरल्या. या सगळ्यांच्या शरीरातून बराच रक्तस्राव झाला. त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच चार जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.  मृतांमध्ये अतुल मंडलिक, संतोष मंडलिक, दर्शन घरते, यश घरते, चेतन पवार यांचा समावेश आहे. तर राहुल राठोडे (वय 20), लोकेश निकम (वय 18), अरमान खान (वय 15), ओम काळे, अक्षय गुंजाळ, राहुल साबळे हे सर्वजण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी पोलिसांकडून बराचवेळ वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरु होते. परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, भद्रकाली पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम व अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरु करुन जखमींना रुग्णालयात पाठवले.

पिकअप टेम्पोमधील मुलांचं शेवटचं स्टेटस व्हायरल

नाशिकमधील या दुर्घटनेत मृत्यू झालेली मुलं ही सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी होती. हे सर्वजण  निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होते. महिलांचा टेम्पो सुरक्षितपणे सह्याद्रीनगर येथे पोहोचला. मात्र, पुरुषांच्या ट्रकचा द्वारका पुलावर अपघात झाला.

या अपघाताच्या काहीवेळापूर्वीच टेम्पोमधील मुलांनी सोशल मीडियावर एक स्टेटस शेअर केले होते. यामध्ये टेम्पोच्या मागच्या बाजूला ही सर्व मुले गाण्यावर नाचत होती. काही मुले टेम्पोच्या वरच्या भागावर चढून बसली होती. सर्वजण आनंदात होते. मात्र, पुढील काही क्षणांमध्येच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने सह्याद्रीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा

नाशकात पिकअप अन् आयशरचा भीषण अपघात, देवदर्शनाहून परतत असलेल्या सहा जणांचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ladki Bahin Yojana : 'लाडकी'ला खात्री म्हणून मदतीला कात्री, शेतकऱ्यांची मदत रखडलीSpecial Rpeort Prashant Koratkar : पोलिसांचं सहकार्य? 'चिल्लर' प्रशांत कोरटकर सापडत कसा नााही?Nitin Gadkari Speech Amravati | तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या नाही दिलं तरी चालेल- गडकरीAditya Thackeray Cricket | राजकारणानंतर क्रिकेटच्या मैदानावर आदित्य ठाकरेंची षटकारबाजी ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
Embed widget