एक्स्प्लोर

Nashik Crime : मुलीनं लव्ह मॅरेज केलं, पालकांचं कडाक्याचं भांडण; वडिलांनी कोयता अन् कुकरच्या झाकणाने मारहाण करुन आईला संपवलं, नाशिक हादरलं

Nashik Crime : मुलीने प्रेम विवाह केल्याने गेल्या काही दिवसांपासून पती आणि पत्नीमध्ये वाद सुरु होते. याच वादातून पतीने पत्नीला संपवल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे.

Nashik Crime : नाशिक शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पतीने पत्नीचा कोयता आणि कुकरच्या झाकणाने वार करत खून केल्याची घटना गंगापूर रोड (Gangapur Road) परिसरात घडली आहे. मुलीने प्रेम विवाह केल्याने गेल्या काही दिवसांपासून पती आणि पत्नीमध्ये वाद सुरु होते. याच वादातून पतीने पत्नीला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर रोडवरील डी. के. नगर भागात असलेल्या स्वास्तिक निवास (बी-विंग) सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील गोरे दाम्पत्य हे मुलासह भाडेतत्वावर सदनिकेत राहत होते. मंगळवारी मुलगा सकाळी कामावर निघून गेल्यानंतर सविता-छत्रगुन हे पती-पत्नी घरात एकटेच होते. दुपारी पती-पत्नीमध्ये भांडण झाले. यावेळी छत्रगुन गोरे (५०) याने रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरचे झाकणाने जोरदार प्रहार केला.

पतीने केली पत्नीची हत्या

यामुळे सविता गोरे या रक्तबंबाळ अवस्थेत लाकडी पलंगावर कोसळल्या. यावेळी त्यांची विवाहित मुलगी फिर्यादी मुक्ता बालाजी लिखे ही त्याचवेळी घरी आल्यानंतर दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा वाजविल्यानंतर तिचे वडील छत्रगुनने दरवाजा उघडला असता आई रक्तबंबाळ अवस्थेत बेडरूममध्ये पडलेली आढळून आली. 

फरार पतीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मात्र छत्रगुन हा फरार झाला होता. मुक्ता हिने शेजाऱ्यांचे दार वाजवून मदत मागितली यावेळी रहिवाशांनी धाव घेतली.  या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने प्रेम विवाह केल्याने गेल्या काही दिवसांपासून पती आणि पत्नीमध्ये वाद सुरु होते. याच वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर फरार पतीस पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत. 

पंचवटीत महिलेचा विनयभंग

दरम्यान, वडजाई मातानगर परिसरात राहत्या घराजवळ महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. संशयित खुशाल माळी याने मखमलाबाद रोडवरील वडजाईमातानगर येथे येऊन राहत्या घराजवळ फिर्यादीचा हात पकडला. तू माझा फोन का उचलत नाही? माझ्याशी का बोलत नाही, असे बोलून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच फिर्यादी महिलेने घाबरून घराचा दरवाजा बंद करून घरात बसलेली असताना घराचा दरवाजा वाजवून शिवीगाळ, दमदाटी केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nandurbar News : रस्ता नसल्याने महिलेची घरीच प्रसुती, बाळ दगावलं, आईची तब्येत खालावल्याने बांबूच्या झोळीतून 15 किमीचा जीवघेणा प्रवास, नंदुरबारमधील धक्कादायक घटना

Bhandara : चालकाला आली झोपेची डूलकी अन् क्षणात होत्याचं झालं नव्हतं! DJ वाहनाचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर, तीन गंभीर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 26 March 2025Special Report | Santosh Deshmukh | मास्टरमाईंड हत्येचा वाल्मिक कराडच! खटला ट्रॅकवर, न्याय लवकर?Special Report|Opposition Leader | संपला कालावधी निवड कधी? विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्तच राहणार?Special Report | Kunal Kamra | गाण्यावरुन वादंग, कामरावर हक्कभंग; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी सभागृहात गोंधळ

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
Embed widget