Nashik Diwali : नाशिककर दिवाळीचा फराळ खरेदी करताय? अन्न व औषध प्रशासनाच्या सूचना वाचाच
Nashik Diwali : नाशिकच्या (Nashik) अन्न व औषध प्रशासनाने (Food And Drugs) दिवाळी (Diwali) फराळ खरेदीबाबत सूचना केल्या आहेत.
Nashik Diwali : सणासुदीच्या (DIwali Festival) काळात मिठाई, खवा, मावा, खाद्यतेल, तूप, वनस्पती तुपातील भेसळीनिमित्त (Adulterated) 31 प्रकरणांमध्ये तब्बल 1 कोटी 31 लाख 18 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिकच्या (Nashik) अन्न व औषध प्रशासनाने (Food And Drugs) ही कारवाई केली असून दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
दिवाळीत खवा, रवा, मावा, नमकीन, मिठाई यांना प्रचंड मागणी असते. त्यामुळे या काळात कमी दर्जाच्या उत्पादनाची भेसळयुक्त पदार्थांची बाजारात विक्री होण्याची शक्यता असते. सिडकोतील 14 मिठाई दुकानदारांकडून 26 मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात उल्लंघन झाल्याचे आढळल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सहआयुक्त परळीकर यांनी कळविले आहे. सणासुदीच्या काळात कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे आणि विवेक पाटील यांनी दिला आहे.
सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासन मार्फत नाशिक शहर व जिल्ह्यातील मिठाई खवा मावा खाद्यतेल वनस्पती ही व सणासुदीच्या अन्नपदार्थ उत्पादक विक्रेते यांच्या तपासणीची विशेष मोहीम खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी राबवली जात आहे. यावर्षी दिवाळीच्या अनुषंगाने विविध पथकांमार्फत जिल्ह्यात तपासणी सुरू असल्याची माहिती सहआयुक्त गणेश परळीकर यांनी दिली. तसेच या कामासाठी एक दक्षता पथकाची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
दिवाळीत मिठाई खवा मावा नमकीन आणि पदार्थांना मोठी मागणी असते त्यामुळे या काळात भेसळ कमी दर्जाच्या उत्पादनाची बाजारात विक्री होण्याची शक्यता अधिक असते हे प्रकार लोकांसाठी तसेच ग्राहक आणि सुरक्षित सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी संशोध पदार्थांचे नमुने घेतले जात आहेत ऑगस्ट 2022 पासून या मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात मिठाई व नमकीनचे 32 खाद्यतेल व वनस्पतीचे 39 दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांचे 35 सणासुदीच्या विविध अन्नपदार्थ 45 असे एकूण 151 नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत तसेच भगर यांना पदार्थाचे उत्पादकांकडून 21 नमुने घेण्यात आले आहेत. तसेच भेसळीच्या संशयावरून कायद्याचे उल्लंघनाबाबत 31 प्रकरणात खाद्यतेल, मावा, मिठाई, पनीर, भगर इत्यादी अन्न पदार्थांचा एकूण 1 कोटी 31 लाख 18 हजार 450 साठा जप्त करण्यात आला आहे.
नाशिक शहरातील नवीन नाशिक भागात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने सुमारे 14 मिठाई दुकानदार व विक्रेत्यांच्या तपासणीची विशेष मोहिमेत हाती घेण्यात आली आहे त्यात सुमारे 26 मिठाई व इतर त्या संबंधित अन्य पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत व ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील उल्लंघनानुसार दोषीविरुद्ध कडक कारवाई घेण्यात येईल असे सहायुक्त अन्न नाशिक यांनी नमूद केले. अशा प्रकारची संभावित भेसळ र्पखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्न पदार्थ उत्पादक, रिपॅकर, घाऊक विक्रेते यांच्या तपासणीसाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नियमित पथकासह दक्षता पथकाचीही नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती विभागाचे सहआयुक्त गणेश परळीकर यांनी दिली.
अशी घ्या काळजी
ग्राहकांनी अन्नपदार्थ परवानाधारक नोंदणी धारक दुकाने व व्यापाऱ्याकडूनच खरेदी करावेत. मिठाई दुग्धजन्य पदार्थ ताजे व आवश्यकतेनुसार खरेदी करावेत. व ते त्वरित अथवा सूचनेनुसार 24 तासाच्या आत सेवन करावेत. अन्नपदार्थ साठवणूक करताना आवश्यकतेनुसार ते विशिष्ट तापमानात फ्रिजमध्ये ठेवावेत. अन्नपदार्थ खरेदी करताना युज बाय डेट तपासून घ्यावी. उघड्यावरील अन्नपदार्थ खरेदी करू नयेत. भेसळीबाबत खात्री आल्यास त्वरित अन्न प्रशासनाकडे तक्रार करावी.