Snake in Train: बाप रे बाप... धावत्या ट्रेनच्या एसी डब्यात साप, प्रवाशांच्या डोक्याला ताप, पाहा व्हिडीओ
Jabalbpur Mumbai Garib Rath Express : जबलपूर-मुंबई गरीब रथ एक्स्प्रेस कसाऱ्याजवळ थांबलेली असताना त्यामध्ये सापानं प्रवेश केला होता.
मुंबई : मध्य प्रदेशमधील जबलपूर आणि महाराष्ट्रातील मुंबई दरम्यान गरीब रथ ही एसी ट्रेन चालवली जाते. या ट्रेनमधील एक खळबजनक प्रकार काल समोर आला. कसारा होम सिग्नल जवळ ट्रेन उभी होती त्यावेळी साप झाडावरुन ट्रेनमध्ये आला. जबलपूरहून ही ट्रेन मुंबईकडे जात होती. त्यावेळी कसाऱ्याजवळ ट्रेन थांबली असताना सापानं एसी कोचमध्ये प्रवेश केल्यानं प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला. तर, काही प्रवाशांनी याचा व्हिडीओ चित्रीत करुन सोशल मीडियावर शेअर केला.
नेमकं काय घडलं?
जबलपूर-मुंबई गरीबरथ एक्स्प्रेस कसाऱ्याजवळ होम सिग्नल जवळ उभी होती त्यावेळी झाडावरुन सापानं ट्रेनमध्ये प्रवेश केला. गरीबरथ एक्स्प्रेसच्या एसी जी 17 डब्यात साप दिसल्यानं प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. प्रवाशांनी सापावर ब्लँकेट टाकून ट्रेनमधून बाहेर फेकण्याचा प्रयत्न आला. ब्लँकेट ट्रेनच्या बाहेर गेलं मात्र साप बाहेर गेला नाही. यानंतर प्रवाशांना त्या डब्यातून दुसऱ्या डब्यात पाठवण्यात आलं. त्यानंतर रेल्वेचा कोच जबलपूर मुंबई एक्स्प्रेस पासून वेगळा करण्यात आला आणि ट्रेन पुढे मार्गस्थ झाली.
साप बाहेरुन रेल्वेत आला
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स यूजर अभिषेक पाठक यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. अभिषेक पाठक म्हणाले की ते याच डब्यातून प्रवास करत होते. जेव्हा रेल्वे कसाऱ्यात थांबली साप बाहेरुन ट्रेनमध्ये आला. मात्र, स्टाफनं साप बाहेर काढण्यासाठी चांगले प्रयत्न केले, असं ते म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार लोकांनी सापाला ब्लँकेटच्या मदतीनं बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्लँकेट बाहेर गेलं आणि साप एसीच्या पॅनेलमध्ये गेला. त्यानंतर या कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं, तो डबा ट्रेनपासून वेगळा करण्यात आला. प्रवाशांना दुसऱ्या डब्यात पाठवण्यात आलं. ट्रेनमध्ये साप आल्यानं गरीब रथ एक्स्प्रेसला उशीर झाला.
दरम्यान, या घटनेनं जबलपूर मुंबई गरीबरथ एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती.
ट्रेनमध्ये साप, पाहा व्हिडीओ
I was in same coach. It came from outside when train stopped before Kasara. But staff did excellent job to remove it. pic.twitter.com/Y2QdreLt6e
— Abhishek Pathak (@abhishekpathak4) September 22, 2024
इतर बातम्या :