एक्स्प्लोर

Mumbai Valet Parking : पार्किंगची चिंता सोडा, दादरमध्ये आजपासून व्हॅले पार्किंग सुरु

मुंबईतील दादरमध्ये खरेदीसाठी गाड्या घेऊन येणारे ग्राहक कुठेही, कशीही वाहनं उभी करतात, परिणामी वाहतूक कोंडीत भर पडते. यावर तोडगा म्हणून आजपासून दादरमध्ये डिजिटाईज्ड व्हॅले पार्किंग सुविधा सुरु झाली आहे

मुंबई : मुंबई ही जशी स्वप्ननगरी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे तसंच गर्दीचंही शहर आहे. इथे माणसांची जेवढी गर्दी आहे तेवढीच वाहनांची देखील आहे. परिणामी मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या ही कायमचीच आहे. त्यातच दादर परिसरात खरेदीसाठी गाड्या घेऊन येणाऱ्या ग्राहकांचीच संख्या शेकडोंनी असते. मात्र, खरेदी करताना गाड्या  कुठेही, कशाही उभ्या केल्या जात असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. यावर तोडगा म्हणून मुंबईतील दादर परिसरात डिजिटाईज्ड व्हॅले पार्किंग (Digitised Valet Parking) सुविधा सुरु झाली आहे. मुंबई महापालिका, मुंबई पोलीस आणि दादर व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज (18 मे) दादरमध्ये पहिली डिजिटाईज्ड व्हॅले पार्किंग सुविधा सुरु करण्यात आली आहे. 

वाहनधारक त्यांची वाहनं त्यांच्या फोन नंबरसह प्लाझा सिनेमाजवळील व्हॅले पार्किंग बूथवर सोडू शकतात. सर्व वाहने कोहिनूर सार्वजनिक पार्किंग लॉटपर्यंत नेली जातील. जेव्हा परत जाण्याची वेळ येईल, तेव्हा वाहनचालक एसएमएसद्वारे पाठवलेल्या लिंकवर क्लिक करुन त्यांचे वाहन प्लाझा सिनेमाजवळ आणण्याची विनंती करु शकतात. पहिल्या चार तासांसाठी 100 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक तासासाठी अतिरिक्त 25 रुपये आकारले जातील. पार्क+ (Park +) हे एक स्टार्ट-अप दररोज 11 तास बूथ चालवेल.

प्लाझा सिनेमाजवळ आज पहिलं बूथ उघडल्यानंतर डिजिटाईज्ड व्हॅले पार्किंग सेवा लवकरच दादर आणि शिवाजी पार्कमधील आणखी चार ठिकाणी विस्तारित केली जाईल. मुंबई महापालिका 29 सार्वजनिक पार्किंग लॉट्स (PPL) चालवते, परंतु याचा वापर फारच कमी जण करतात. बहुतांश वाहनचालक रस्त्यावर पार्किंग करतात.

"दादर हे खरेदीचं आणि सिनेमा-नाट्यगृहांचं केंद्र आहे. पण वाहनचालकांना पहिल्यांदा पीपीएलकडे जाऊन नंतर खरेदी करणं गैरसोयीचं वाटतं. शिवाय रस्त्यावर पार्किंग केल्याने वाहनं उचलून घेऊन जाण्याची भीती नेहमीच असते. मागील वर्षी सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांनी तीन महिने मोफत व्हॅले पार्किंगची व्यवस्था केली होती. याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. दररोज सरासरी 85 कार व्हॅलेद्वारे पार्क केल्या जात होत्या. दिवाळीच्या दिवशी ही संख्या 94 वर पोहोचली होती, अशी माहिती दादर व्यापारी संघाचे दीपक देवरुखकर यांनी दिली. त्यानंतर, व्यापार्‍यांच्या संघटनेने पार्क+ (Park +) या स्टार्ट-अपशी हातमिळवणी केली.

दादर व्यापारी संघाचे सुनील शहा म्हणाले की, "फक्त दुकानदारच नाही, दादर आणि शिवाजी पार्कला येणारे, मित्रांसोबत बाहेर जेवायला गेलेले कोणीही व्हॅले  पार्किंगचा लाभ घेऊ शकतात."

"आम्ही लग्नाचे हॉल आणि शॉपिंग सेंटर्सच्या बाहेरील रस्त्यावरील पार्किंग बंद करु. आमच्याकडे कोहिनूर पीपीएलमध्ये 1 हजार 721 कारसाठी जागा आहे. लग्नाचे हॉल आणि शॉपिंग सेंटर्सना आवाहन केलं आहे की त्यांनी अभ्यागतांना व्हॅले पार्किंग सुविधा वापरण्यास सांगावं," असं मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं.

मुंबईतील पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुंबई पार्किंग प्राधिकरणाच्या सदस्यांनी सांगितलं की, "जिथे पीपीएलची जागा कमी आहे तेथे व्हॅले पार्किंगला प्रोत्साहन दिलं पाहिजे. शहराच्या इतर भागातही व्हॅले पार्किंग बूथ उभारावे की नाही हे वाहनचालकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे."

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai ACB Trap Worli : राज्य कामगार विमा योजनेच्या लेखा अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; तब्बल साडेसात लाखांची केली होती मागणी
राज्य कामगार विमा योजनेच्या लेखा अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; तब्बल साडेसात लाखांची केली होती मागणी
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा

व्हिडीओ

Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Embed widget