एक्स्प्लोर

Maharashtra Rojgar Melava 2022 : 75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात, 2 हजार जणांना नियुक्तीपत्र, पोलिसांच्या 18 हजार पदांसाठी लवकरच जाहिरात

Maharashtra Rojgar Melava 2022 : राज्यातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. या महासंकल्प रोजगार मेळाव्याची सुरुवात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली.

मुंबई : महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार नोकऱ्या देण्याचा निश्चय सरकारचा आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली. 2 हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. हे आकडे पुढे वाढत जातील. पण हा शेवटचा अटेम्प्ट किंवा शेवटची संधी समजू नका, कोर्टात जाऊन जागा अडवू नका किंवा स्थगिती आणू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं.  राज्यातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने महाराष्ट्रात (Maharashtra) वर्षभरात 75 हजार रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. या महासंकल्प रोजगार मेळाव्याची सुरुवात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. आज दोन हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्यातील तरुणांच्या रोजगाराच्या पूर्ततेची सुरुवात राज्य सरकारने केली आहे. केंद्र सरकार आपल्या केंद्रीय विभागात 10 लाख नोकऱ्या देणार आहे. राज्यानेही आपल्या राज्यात तरुण तरुणींना रोजगार द्याव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सूचना केल्यानंतर पहिले राज्य महाराष्ट्र ठरले आहे".

महाराष्ट्रात 75 हजार जागा भरणार  (Maharashtra Jobs)

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकार 75 हजार जागा भरणार आहे. शासकीय नोकरीत अघोषित बंदी आहे ती संपवावी असा निर्धार सरकारने केला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

18 हजार जागांची पोलीस भरती (Maharashtra Police Job) 

येत्या काळात साडे 18 हजार पोलीस भरतीची जाहिरात काढत आहोत.  ग्राम विकास विभागतदेखील आपण काही पदं भरणार आहोत.  सरकारी नोकऱ्या या पारदर्शी झाल्या पाहिजेत. मागच्या काळात जे घोटाळा पाहायला मिळाले तसे होणार नाही. देशात ज्या बेस्ट एजन्सी आहेत त्यांना काम दिलं पाहिजे असा आम्ही निर्णय घेतला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

15 हजार स्टार्ट अप महाराष्ट्रात (Maharashtra Startup Plans)

देशात 80 हजार स्टार्ट अप मधील 15 हजार स्टार्ट अप महाराष्ट्रात. रोजगार देणारे स्वयंरोजगार तयार करायचे आहेत. राज्याची स्टार्टअप पॉलिसी तयार केली आहे. स्टार्ट अप तयार करून त्याचा विस्तार करण्यासाठी वित्त पुरवठा करत आहोत, असं फडणवीसांनी सांगितलं. 

दोन कंपन्यांची नियुक्ती

नोकरभरतीच्या प्रक्रियेसाठी दोन एजन्सी आपण नेमल्या आहेत. एक TCS आणि IBPS ही कंपनी आपण नेमली आहे. लवकरच आपण परीक्षा घेणार आहोत. आधी सर्व गोष्टींची पडताळणी झाली पाहिजे अशा आम्ही सूचना दिल्या आहेत.  कुठल्याही कोर्ट केसेस न होता पारदर्शक पणे भरती झाली आहे, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 

75 हजार जागा एका वर्षात भरण्याचे आम्ही ठरवले आहे. नंतर छोट्या छोट्या भरती प्रक्रिया करू. चुका होऊ नये आणि पारदर्शी पद्धतीने ही भरती आपण करत आहोत. 75 हजार रोजगाराच्या महामेळाव्याची ही सुरुवात आहे. येत्या काळात आपण चांगल्या पद्धतीने आपण ही भरती करणार आहोत. रोजगार महामेळाव्याचे आयोजन आपण ठरवलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

रोजगार मेळाव्याला दिग्गजांची उपस्थिती

एका वर्षात 75 हजार रोजगार देण्याचा महासंकल्प कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

VIDEO : देवेंद्र फडणवीस यांचं संपूर्ण भाषण ( Maharashtra Rojgar Melava 2022  : Devendra Fadnavis Full Speech)

संबंधित बातमी 

Maharashtra Government Jobs : 75 हजार पद भरतीतला मोठा अडथळा दूर, कोणत्या खात्यात किती जागा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
Dharashiv Crime : धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखीच संतापजनक घटना, 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून
धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखीच संतापजनक घटना, 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून
Maharashtra Weather Update: उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
Mumbai Motilal Nagar redevelopment: गोरेगावच्या मोतीलाल पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाची 36000 कोटींची बोली, 143 एकरांचा प्रोजेक्ट अदानींना मिळाला
मुंबईतील आणखी एक मोठा पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळाला, 36000 कोटींची बोली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 March 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : 12 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : ABP Majha : Maharashtra NewsABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 12 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
Dharashiv Crime : धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखीच संतापजनक घटना, 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून
धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखीच संतापजनक घटना, 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून
Maharashtra Weather Update: उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
Mumbai Motilal Nagar redevelopment: गोरेगावच्या मोतीलाल पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाची 36000 कोटींची बोली, 143 एकरांचा प्रोजेक्ट अदानींना मिळाला
मुंबईतील आणखी एक मोठा पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळाला, 36000 कोटींची बोली
'क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ हैं?'; एअरटेल गॅलरीत मराठीतून न बोलण्यासाठी तरूणीची मुजोरी, VIDEO
'क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ हैं?'; मुंबईतील एअरटेल गॅलरीत मराठीतून न बोलण्यासाठी तरूणीची मुजोरी, VIDEO
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
Mutual Fund : इंडसइंड बँकेचा शेअर 27 टक्क्यांनी गडगडला, लोअर सर्किट लागताच म्युच्युअल फंडांचे 7300 कोटी बुडाले, यादी समोर
इंडसइंड बँकेच्या शेअरला लोअर सर्किट, स्टॉकमध्ये 27 टक्क्यांची घसरण, म्युच्युअल फंडांचे 7300 कोटी बुडाले
IndusInd Bank : इंडसइंड बँकेचा शेअर गडगडला,  बाजारमूल्य तब्बल 19000 कोटींनी घटलं, गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार? 
इंडसइंड बँकेचा शेअर गडगडला, लोअर सर्किट लागताच बाजारमूल्य 19000 कोटींनी घटलं, आज काय होणार?
Embed widget