Girl dance On Mumbai Local : मुंबई लोकलमध्ये अश्लील नृत्य करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल, भोजपुरी गाण्यावर अश्लील डान्स
Girl dance On Mumbai Local : सार्वजनिक ठिकाणी रिल्स बनवून प्रसिद्ध होण्यासाठी तरुण-तरुणी प्रयत्न करत असतात. अशाच एका तरुणीने मुंबई लोकलच्या डब्यात अश्लील नृत्य (obscene dance) करुन रिल्स बनवून सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल केला.
Girl dance On Mumbai Local : सार्वजनिक ठिकाणी रिल्स बनवून प्रसिद्ध होण्यासाठी तरुण-तरुणी प्रयत्न करत असतात. अशाच एका तरुणीने मुंबई लोकलच्या डब्यात अश्लील नृत्य (obscene dance) करुन रिल्स बनवून सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल केला. सध्या हा व्हिडिओ चांगलाच वायरल (Viral Video) होत आहे. मात्र, यामुळे आता त्या तरुणीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. रेल्वे पोलिसांनी (Railway Police) या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
भोजपुरी गाण्यावर अश्लील डान्स
वायरल व्हिडिओमध्ये भोजपुरी गाण्यावर तरुणी अश्लील नृत्य करत असल्याचे दिसून येत आहे. महिलांच्या डब्ब्यात डान्स करणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पण या व्हायरल व्हिडीओवर (Viral Video) नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर आता अश्लील नृत्य करण्याचं हे फॅड दिवसेंदिवस वाढू नये यासाठी रेल्वे पोलिसांनी या प्रकरणांची दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत.
@RPFCR @RPF_INDIA Kindly look into the matter.
— GRP Mumbai (@grpmumbai) February 24, 2024
रेल्वे प्रशासनाचे कारवाईचे आदेश
रेल्वे प्रशासनाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या डान्स रिलची दखल घेतली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी एक्सवरिल पोस्टमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. ही बाब लक्षात घेण्याचा उल्लेख केला. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाने मध्य रेल्वे सुरक्षा विभागाला या घटनेची चौकशी करुन आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अश्लील डान्स करणारी तरुणी नेटकऱ्यांकडून ट्रोल
दरम्यान, डान्स रील्सवर (Viral Video) प्रतिक्रिया देताना लोकांनी तरुणांला तुफान ट्रोल केले आहे. इतर अनेकांनी प्रत्युत्तरात मीम्स शेअर केले आहेत. तर एका यूजरने लिहिले की,"मला वाटते की, धावत्या ट्रेनमध्ये पूर्ण सार्वजनिक दृश्यात याची परवानगी दिली जाऊ नये." काही नेटकऱ्यांनी डान्सरच्या आणखी एका व्हिडिओ (Viral Video) याच पोस्टवर शेअर केला आहे. इतर लोकांनी या कृत्याचा निषेध केला आणि इतर प्रवाशांसाठी त्रासदायक आहे, असे म्हटले आहे. या प्रकाराची नोंद रेल्वे पोलिसांनी देखील घेतली आहे.
Now I know why railways stocks are skyrocketing pic.twitter.com/HBaExbats4
— desi mojito 🇮🇳 (@desimojito) February 23, 2024
इतर महत्वाच्या बातम्या