(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Parab : 'हिंदू डॉन'ही कोणती संकल्पना आणली? तुम्हाला आता हिंदू डॉन कशाला पाहिजेत? अनिल परब यांचा भाजपला सवाल
Anil Parab in VidhanSabha : 'हिंदू डॉन'ही कोणती संकल्पना आणली? तुम्हाला आता हिंदू डॉन कशाला पाहिजेत? असा सवाल ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी भारतीय जनता पक्षाला केला आहे.
Anil Parab in VidhanSabha : 'हिंदू डॉन'ही कोणती संकल्पना आणली? तुम्हाला आता हिंदू डॉन कशाला पाहिजेत? असा सवाल ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी भारतीय जनता पक्षाला केला आहे. पुण्यातले (Pune) तुमचे गुंड मंत्रालयात येऊन रिल्स करतात. पोलीस आयुक्तांनी यांना गुडघ्यावर बसवायला हवे होते. नंतर परेडमध्ये पोलीस कानात सांगतात की असे करू नका. ही पोलिसांची (Police) पद्धत आहे का? पोलिसांना demoralised का करत आहात, असे ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) म्हणाले आहेत. ते विधीपरिषदेत बोलत होते.
एक आमदार बायकोला फोटो दाखवेन म्हणतो हे काय 'पार्टी वीथ डिफरंस'?
एक आमदार हवेत गोळीबार करतोय. एक आमदार हात पाय तोडायच्या धमक्या देतो, एक आमदार बायकोला फोटो दाखवेन म्हणतो हे काय 'पार्टी वीथ डिफरंस'अशी विचारणा त्यांनी भाजपला केली आहे. पुढे बोलताना अनिल परब म्हणाले, आमदार फायरिंग करतो, रिव्हॉल्वर कोणी फायर केली हे पब्लिक डोमेनमध्ये आणा.हे ट्रिपल इंजिन सरकार एवढं धावतंय की मागे डबे राहतात की नाही हेही बघत नाही. काही बिनकामाचे डबे जोडलेत. तुमच्यासारखे तुमचाही डबा कुठेतरी डिसमेंटल करून टाकतील बघा, असा टोला अनिल परब यांनी शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांना लगावला आहे.
एवढे दिवस नुसत्या एसआयटी स्थापन केल्यात
पुढे बोलताना अनिल परब म्हणाले, 47 हजारांसाठी मला सात दिवस बसवून ठेवले. इकडे एक आमदार सांगतोय की,माझे सीएमकडे शेकडो कोटी रूपये आहेत. मग ईडी कुठे गेली. एका एजंटकडे दीडशे ईडीच्या फाईल्स सापडल्या.एवढे दिवस नुसत्या एसआयटी स्थापन केल्यात. अहो याच पुढं तुम्ही काय केलं याची माहिती द्या. कोरोना असताना लोकांच्या घरात जायला आम्ही पाहिजे असं तुम्ही म्हणत होतात. आता मला सांगा तुम्ही फ्री आहात करा लोकांची कामे.आता कामे का होतं नाहीत? असा सवालही परब यांनी केला.
माझ्या मित्राला 11 महिने जेल मध्ये ठेवलं
माझ्या मित्राला 11 महिने जेल मध्ये ठेवलं आणि आता सुप्रीम कोर्टात सांगितलं की आमचं काहीही आक्षेप नाही. मग त्याला जेलमध्ये ठेवलाच कशाला? तुमचं आणि माझं भांडण आहे. आपण आपल्यात निपुटन घेऊ. मात्र तुमच्यात जे गँगवॉर सुरू आहे ते आधी थांबवा. आमच्या दररोज कानावर येत आहे की कोण कुणाची फाईल कापत आहे. कोण कुणाचा कान कापत आहेत याची माहिती आम्हाला मिळत आहे,आता तरी हे थांबवा, असे आवाहनही अनिल परब यांनी केले.
इतर महत्वाच्या बातम्या
Kisan Sabha : किसान सभेचा राज्य सरकारला तीन दिवसाचा अल्टीमेटम; प्रसंगी मुंबईपर्यंत लाँग मार्च काढणार