Todays Headline : भारत जोडो यात्रा नांदेडमधून सुरू होणार, वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण , जाणून घ्या दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Todays Headline : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) काल महाराष्ट्रात (Maharashtra) देगलूर येथे दाखल झाली आहे. आज सकाळी 8.30 वाजता नांदेडमधील (Nanded) गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात होईल. तसेत आज देशात चंद्रग्रहणाचं (Chandra Grahan) दर्शन होणार आहे. याबरोबरच शरद पवार यांच्या (Sharad Pawar) हस्ते साने गुरुजी (Sane Guruji) यांच्या उपोषण स्थळी पंढरपूर येथे उभारलेल्या सत्याग्रह स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) नांदेडमधील गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात देगलूर येथे दाखल झाली आहे. आज सकाळी 8.30 वाजता नांदेडमधील गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात होईल.
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबादच्या दौऱ्यावर
आदित्य ठाकरे आज औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. ते सकाळी 11 वाजता औरंगाबाद येथील पैठण येथे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करतील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
बारामतीत अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आंदोलन
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदरा सुप्रिया सुळे यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात बारामतीत आंदोलन केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सकाळी साडे नऊ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.
यवतमाळमध्ये अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आंदोलन
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला कॉग्रेस कडून यवतमाळमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.
आज वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण
आज देशात चंद्रग्रहणाचं दर्शन होणार आहे.
शरद पवारांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या उपोषण स्थळी उभारलेल्या सत्याग्रह स्मारकाचा लोकार्पण सोहळा
पंढरपूर येथे साने गुरुजी यांच्या उपोषण स्थळी उभारलेल्या सत्याग्रह स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. पवार झूमवरून हॉस्पिटल मधून भाषण करणार असून त्यांच्या ऐवजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
खेडमध्ये रामदास कदमांची पत्रकार परिषद
रत्नागिरीमधील खेड थेथे दुपारी 12 वाजता रामदास कदमांची पत्रकार परिषद होणार आहे.