एक्स्प्लोर

ST Workers Strike Updates : कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली; सदावर्तेच्या अटकेनंतर मोठी वाढ

ST Workers Strike Updates : संपानंतर आता पुन्हा कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. अॅड. सदावर्तेच्या अटकेनंतर ही संख्या आणखी वाढली आहे.

ST Workers Strike Updates : हायकोर्टाच्या निर्देशानंतर आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यानंतर कामावर परतणाऱ्या एसटी कर्माचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. यातील बहुतेकजण सदावर्तेंच्या अटकेनंतर रुजू झाले आहेत. मात्र, अटकेचा आणि कामावर रुजू होण्याचा संबंध नसल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. कर्मचारी पुन्हा कामावर रूजू होत असल्याने राज्यातील एसटी पुन्हा धावणार असल्याची चिन्हं आहेत. 

एसटी कर्मचाऱ्यांची बाजू हायकोर्टात मांडणारे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि एसटी कर्मचाऱ्यांना शरद पवार यांच्या घरावर आंदोलन केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा कामावर परतण्याचा ओघ वाढला असल्याचे दिसून येते. कामावर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या ११ एप्रिलपर्यंत ४४ हजार ४३५ वर पोहचली आहे. येत्या काही दिवसांत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती वैद्यकीय प्रमाणपत्रामुळे लांबली असल्याचे म्हटले जात आहे. बुधवार, गुरुवारपर्यंत कामावर परतणाऱ्यांची संख्या 50 हजार होण्याचा अंदाज आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांनी मागील पाच महिन्यांपासून संप पुकारला आहे. एसटीमध्ये सध्या 29303 चालक आणि 24670 वाहक आहेत. त्यातील अनेकजण पुन्हा कामावर रुजू होत आहेत. त्यातील अनेकांची नियुक्ती वैद्यकीय कारणांनी लांबली आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हे कर्मचारी कामावर रुजू होणार आहे. हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देशही राज्य सरकार, एसटी महामंडळाला देण्यात आले होते. 

सदावर्तेंना स्वखुशीने पैसे दिले; एसटी कर्मचाऱ्यांकडून घोषणा पत्र व्हायरल

एसटी कामगारांसाठी न्यायालयीन लढा देत त्यांचा नेतृत्व करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आम्ही स्वखुशीने प्रत्येकी तीनशे रुपये दिले होते, अशा आशयाचं एक घोषणा पत्र सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर फिरत आहे. न्यायाधीशांना उद्देशून हे घोषणा पत्र असून त्याची प्रतिलिपि पोलीस अधिकाऱ्यांना आहे. हे घोषणापत्र कोणी तयार केले याबद्दल त्यात कुठलाही उल्लेख नसला तरी सदावर्ते यांना स्वखुषीने तीनशे रुपये दिल्याची घोषणा करणाऱ्या कामगाराची स्वाक्षरी त्यामध्ये असावी अशा पद्धतीने हे घोषणापत्र तयार करण्यात आले आहे.

ST Workers Strike Updates : कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली; सदावर्तेच्या अटकेनंतर मोठी वाढ

'सिल्वर ओक' वरील आक्रमक आंदोलन प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या सदावर्ते यांना न्यायालयीन लढाईत त्यांनी एसटी कामगारांकडून दबावाने, बळजबरीने पैसे गोळा केलेले नाही हे सिद्ध करण्यासाठीच हे घोषणापत्र तयार करण्यात आले असावे अशी चर्चा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget