एक्स्प्लोर

'सरकारकडे अर्थ नसला तरी शब्दरत्न बक्कळ आहेत'; सामनातून मोदी सरकारवर टीका

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. शनिवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फसव्या घोषणा, पोकळ तरतुदी असल्या तरी अर्थमंत्र्यांनी रेकॉर्डब्रेक भाषणातून 18 हजार 926 शब्दरत्नांची उधळण केली असल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

मुंबई : अर्थसंकल्पावरुन शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात फसव्या घोषणा, पोकळ तरतुदी असल्या तरी अर्थमंत्र्यांनी रेकॉर्डब्रेक भाषणातून 18 हजार 926 शब्दरत्नांची उधळण केली आहे. सरकारकडे अर्थ नसला तरी शब्दरत्न बक्कळ आहेत, असाच त्याचा अर्थ असल्याचं सामनातून म्हटलं आहे.

'केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प मांडताना 2 तास 41 मिनिटांचे रेकॉर्डब्रेक भाषण केले खरे, पण हा सगळा फक्त 'शब्दांचा खेळ'च ठरला. अर्थसंकल्प म्हणजे शब्द आणि आकड्यांचा खेळ असतो हे मान्य केले तरी त्याला सरकारच्या संकल्पाची बैठक असायला हवी. अन्यथा ती नुसतीच घोषणा आणि तरतुदींची आकडेमोड ठरण्याचा धोका असतो. शनिवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात घसरलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचा आव आणला आहे.', असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ : केंद्रीय अर्थसंकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान, सामना अग्रलेखातून जरी मोदी सरकारवर टीाका होत असली तरीही नागरिकत्व दुरूस्ती कायद्याबाबतच्या शिवसेनेच्या भूमिकेबाबत संभ्रम असल्याचं दिसून येत आहे. नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तर सोनिया गांधींच्या काँग्रेसनं तीव्र विरोध दर्शवला आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा की विरोध आहे या चर्चांना उधाण आलं आहे. त्यासाठी कारणीभूत ठरली आहे ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेली मुलाखत. सीएएमुळे देशातील कोणत्याही नागरिकाची नागरिकता हिसकावून घेतली जाणार नसल्याचं उद्धव ठाकरे मुलाखतीतून म्हणाले आहेत. मात्र, एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ दिला जाणार नाही हे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी सीएएला पाठिंबा दर्शवला तर तो महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का असेल, तर एनआरसीवरुन ठाकरे सरकार आणि मोदी सरकार यांच्यातला संघर्ष अटळ असल्याची चिन्ह आहेत.

सामना अग्रलेख – फक्त 'शब्दांचीच रत्ने'

संत तुकारामांनी एका अभंगात 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' असे म्हटले आहे. अभंगात त्याचा आशय वेगळा असला तरी केंद्रातील मोदी सरकारची अवस्था सध्या एका अर्थाने अशीच झाली आहे का? शनिवारी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना केलेले भाषण त्याचेच निदर्शक नाही का? अर्थसंकल्पात फसव्या घोषणा, पोकळ तरतुदी असल्या तरी अर्थमंत्र्यांनी आपल्या रेकॉर्डब्रेक भाषणातून तब्बल 18 हजार 926 'शब्दरत्नां'ची उधळण केली. सरकारकडे 'अर्थ' नसला तरी 'शब्दरत्न' बक्कळ आहेत असाच त्याचा अर्थ!

पाहा व्हिडीओ : दर तीन महिन्यांनी विभागनिहाय बैठका होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प मांडताना 2 तास 41 मिनिटांचे रेकॉर्डब्रेक भाषण केले खरे, पण हा सगळा फक्त 'शब्दांचा खेळ'च ठरला. अर्थसंकल्प म्हणजे शब्द आणि आकडय़ांचा खेळ असतो हे मान्य केले तरी त्याला सरकारच्या संकल्पाची बैठक असायला हवी. अन्यथा ती नुसतीच घोषणा आणि तरतुदींची आकडेमोड ठरण्याचा धोका असतो. शनिवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात घसरलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचा आव आणला आहे. अनेक घोषणादेखील करण्यात आल्या आहेत. नोकरदार मध्यमवर्गीयांना आयकराबाबत नव्या आकर्षक प्रणालीचे गाजर दाखविण्यात आले आहे, मात्र त्याला 'ऐच्छिक' अशी मेखदेखील मारून ठेवण्यात आली आहे. आयकराचे नवे टप्पे भुरळ घालणारे नक्कीच आहेत, पण त्यासाठी मध्यमवर्गीय करदात्यांसाठी जिव्हाळय़ाच्या असलेल्या 'कलम-80'ला नख लावण्याची खेळी सरकार का खेळत आहे? पुन्हा या नव्या 'ऐच्छिक' करप्रणालीमुळे सामान्य करदात्यांची डोकेदुखी आणि कटकटी वाढणारच आहेत. नव्या आयकर प्रणालीनुसार करदात्यांना फायदाच होईल असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे, पण त्यासाठी परंपरागत वजावटींवर पाणी सोडावे लागेल.

मुलांचे शिक्षण शुल्क, 50 हजार रुपयांची प्रमाणित वजावट, विमा हप्ते, प्रॉव्हिडंट फंड योगदान, गृहकर्जावरील व्याज परतफेड अशा अनेक वजावटी मध्यमवर्गीय करदात्यांना 'आधार' वाटत असतात. मात्र भविष्यात मध्यमवर्गीयांचा हा आधार कायमचा काढून घेण्याचा सरकारचा इरादा आहे का? दुसरीकडे एलआयसी, आयडीबीआय बँकेतील सरकारी हिस्सा विकण्याची घोषणा म्हणजे खासगीकरणाचा सपाटा आणखी वाढवण्याचा प्रयत्न आहे. एअर इंडिया, भारत पेट्रोलियम यांच्या विक्रीची घोषणा आधीच झाली आहे. आता त्यात 'एलआयसी'सारख्या सर्वसामान्यांच्या जीवनमरणाची नाळ जुळलेल्या कंपनीचीही भर पडली आहे. सरकारचा खासगीकरणाचा हा सपाटा याच वेगाने चालू राहणार असेल तर सक्षम सरकारी कंपन्या खासगी भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा सरकारचा डाव आहे असे आरोप सरकारवर होणारच. सरकारच्या आर्थिक घडामोडी आणि काहीच न देणारा अर्थसंकल्प पाहता मोदी सरकारवर दुसऱयांदा विश्वास दाखवला ही घोडचूक झाली का, असा प्रश्न मध्यमवर्गीय, नोकरदार आणि कामगार-कर्मचारीवर्गाला पडू शकतो. त्याचे काय उत्तर सरकारकडे आहे?

नेहमीप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्राकडे याही अर्थसंकल्पात दुर्लक्ष करण्यात आले आहे. गुजरातमधील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र बळकट करण्याचा संकल्प त्यात दिसतो, पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसाठी मात्र काहीही विशेष नाही. हा दुजाभाव कशासाठी? बाकी बँकांमधील ठेवींच्या विमा संरक्षणाची मर्यादा एक लाखावरून पाच लाखांपर्यंत वाढवणे, लाभांश वितरणावरील कर रद्द करणे, कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकास या क्षेत्रांवर गेल्या वर्षीपेक्षा 3.48 लाख कोटी रुपये जास्त खर्च करण्याची घोषणा, कंपनी कायद्यात दुरुस्ती करून उद्योगांना होणारा त्रास कमी करण्याचे आश्वासन, 'कृषी उड्डाण' ही नवी योजना, राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ आणि राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रस्ताव, जिल्हा स्तरावर कृषी निर्यात केंद्रांची निर्मिती, ग्रामीण भागातील धान्य साठविण्याचा प्रश्न लक्षात घेऊन जाहीर केलेली ग्रामीण साठवणूक योजना अशा अनेक घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यातील काही दिलासा देणाऱया असल्या तरी बाकी फक्त प्रस्ताव आणि घोषणाच आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदींचे आकडे काही लाख कोटींमध्ये असले तरी सरकारी कंपन्या विकून तिजोरी भरण्याची धडपड पाहता या तरतुदींची अवस्था 'पैसा कमी; तरतुदी उदंड अशीच होणार आहे. संत तुकारामांनी एका अभंगात 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' असे म्हटले आहे. अभंगात त्याचा आशय वेगळा असला तरी केंद्रातील मोदी सरकारची अवस्था सध्या एका अर्थाने अशीच झाली आहे का? शनिवारी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना केलेले भाषण त्याचेच निदर्शक नाही का? अर्थसंकल्पात फसव्या घोषणा, पोकळ तरतुदी असल्या तरी अर्थमंत्र्यांनी आपल्या रेकॉर्डब्रेक भाषणातून तब्बल 18 हजार 926 'शब्दरत्नां'ची उधळण केली. सरकारकडे 'अर्थ' नसला तरी 'शब्दरत्न' बक्कळ आहेत असाच त्याचा अर्थ!

संबंधित बातम्या : 

काँग्रेस, राष्ट्रवादीने थकवल्यामुळे उद्धव ठाकरे सुट्टीवर : नितेश राणे

Koregaon Bhima | राज्य सरकारचं असहकार्य! चौकशी आयोग कामकाज गुंडाळणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget