एक्स्प्लोर

वरोरा नगरपरिषदेतील शिवसेनेच्या नऊपैकी सात नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेस आमदार बाळू धानोरकर यांच्या खेळीमुळे जिल्ह्यातील राजकारणासोबतच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस विरुध्द शिवसेना हा संघर्ष उफाळून आलाय.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगरपरिषदेतील शिवसेनेच्या 9 पैकी 7 नगरसेवकांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर भद्रावती नगरपरिषदेतील शिवसेनेच्या 17 पैकी 12 नगरसेवकांचा काँग्रेस मधला प्रवेश शिवसेनेच्या नेत्यांनी ऐनवेळी रोखलाय. काँग्रेस आमदार बाळू धानोरकर यांच्या या खेळीमुळे जिल्ह्यातील राजकारणासोबतच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस विरुध्द शिवसेना हा संघर्ष उफाळून आलाय.

खा. बाळू धानोरकर यांचे सख्खे भाऊ अनिल धानोरकर गेली दोन टर्म भद्रावती नगरपरिषदेचे अध्यक्ष आहे. तर गेल्या 23 वर्षांपासून भद्रावती नगरपरिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. चंद्रपुरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी दोनवेळा भद्रावती नगरपरिषदेची सत्ता एकहाती खेचून आणली होती. त्यामुळे ही  नगरपरिषद फक्त नावाला शिवसेनेची आणि वस्तूत: काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या ताब्यात होती. तर दुसरीकडे वरोरा नगरपरिषदेत भाजपची सत्ता आहे आणि शिवसेना प्रमुख विरोधी पक्ष आहे. आज बाळू धानोरकर यांनी वरोरा नगरपरिषदेच्या 7 नगरसेवकांचा काँग्रेस मध्ये प्रवेश करवून घेतला. 

मात्र भद्रावती नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेवकांना काँग्रेस पक्षात आणण्यास त्यांना ऐनवेळी अपयश आले. भद्रावती नगरपरिषदेतील शिवसेनेचा बालेकिल्ला कोसळणार असल्याचे लक्षात येताच सेना नेतृत्व तातडीने सक्रिय झाले आणि सेनेचे संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी भद्रावतीत तळ ठोकला. शिवसेनेच्या नेत्यांनी पडद्याआड अनेक घडामोडी केल्या आणि त्यामुळे मविआमधील मित्र पक्षात संघर्ष टाळण्यासाठी शिवसेना नगरसेवकांचा काँग्रेस प्रवेश ऐनवेळी टळला.

 विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा पक्ष प्रवेश झाला त्या भद्रावती येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खासदार बाळू धानोरकर यांची उपस्थिती असतांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अनुपस्थित राहिले. शिवसेनेच्या नगरसेवकांना प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश दिला असता तर त्याचे वेगळे संकेत गेले असते म्हणून नाना पटोले या कार्यक्रमाला अनुपस्थितीत राहिले अशी चर्चा आहे. खा.धानोरकर यांनी मात्र सर्व पक्षांना आपला विस्तार करण्याचा अधिकार असल्याचे सांगत आपण कोणावरही काँग्रेस प्रवेशासाठी दबाव टाकला नसल्याचं म्हटलंय.

दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी या सर्व घडामोडीबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते शिवसेनेच्या ज्या सात नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय ते अनेक वर्षांपासून बाळू धानोरकर यांच्या सोबत आहेत. काँग्रेस प्रवेशामुळे त्यांच्यावर कारवाई नक्कीच होणार आहे. मात्र पुढे होणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक आम्ही निवडून आणू आणि इथल्या खासदार आणि आमदारांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू. या कृतीमुळे महाविकास आघाडीच्या धर्माचं पालन होत नसून आमचे वरिष्ठ याला उत्तर देईल असं सांगतानाच भद्रावती न.प.चा एकही नगरसेवक त्यांच्या सोबत गेला नाही ही पुढच्या निवडणुकीची नांदी आहे असं म्हणत जिल्ह्यात शिवसेना मजबूत असल्याचा विश्वास व्यक्त केलाय.

जिल्ह्यातील या सर्व राजकीय घडामोडींवर भाजपने अपेक्षेनुसार प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी फक्त सत्तेच्या मोहासाठी एकत्र आहे मात्र त्यांच्या एकमेकांविरोधात कुरघोड्या सुरु राहतात. याचा राज्याच्या जनतेला संदेश गेलाय की हे पक्ष फक्त स्वार्थासाठी एकत्र आले आहेत अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09PM 07 July 2024Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Embed widget