एक्स्प्लोर

Pooja Khedkar Update : खरंच घटस्फोट का अधिकारी बनण्यासाठी नाटक? पूजा खेडकरच्या आई वडिलांच्या घटस्फोटासंदर्भात तपासाचा अहवाल केंद्रकडे सादर

Pooja Khedkar Update : पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडिव दिलीप खेडकर यांच्या वैवाहिक संबधाबाबतचा तपास करून त्याचा अहवाल पुणे पोलिसांनी केंद्र सरकारला सादर केला आहे.

Pooja Khedkar Update : राज्यात चर्चेत असलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) आणि तिच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडिव दिलीप खेडकर यांच्या वैवाहिक संबधाबाबतचा तपास करून त्याचा अहवाल पुणे पोलिसांनी केंद्र सरकारला सादर केला आहे. त्यानंतर आता केंद्र सरकार पूजा खेडकरने (Pooja Khedkar) आयएएस होण्यासाठी सादर केलेल्या नॉन-क्रीमी लेयर सर्टिफिकेट वैध ठरवायचं की नाही याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरने आयएएस होण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतण्यासाठी नॉन-क्रीमी लेयर सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्यासाठी पूजा खेडकरने (Pooja Khedkar) तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचा दावा केला होता. 

मात्र, २०२४मध्ये लोकसभा निवडणूक लढवताना सादर केलेल्या शपथपत्रात दिलीप खेडकर (Pooja Khedkar) यांनी मनोरमा खेडकरचा उल्लेख पत्नी म्हणून केला होता. पुणे पोलिसांनी याचा अहवाल केंद्राला पाठवला आहे. तर दुसरीकडे पूजा खेडकर (Pooja Khedkar) आणि दिलीप खेडकर (Dilip Khedkar) गायब आहेत. वाशिमवरून पूजा खेडकर (Pooja Khedkar) कुठे गेली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

पूजा खेडकर (Pooja Khedkar) हिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबतचा अहवाल पुणे पोलिसांनी केंद्राला पाठवला. दरम्यान खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट २०१० मध्ये झाला असला तरी त्यांच्यावरती अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी चौकशी करून महत्त्वाच्या व्यक्तींचे जबाब अहवालात नोंदवले आहेत. केंद्र शासनाकडून घटस्फोटासंदर्भात अहवाल मागवण्यात आला होता. पूजा खेडकर (Pooja Khedkar) हिने यूपीएससीच्या निवड प्रक्रियेमध्ये कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भारत सरकारने राज्य सरकारला खेडकर (Pooja Khedkar) दाम्पत्याचा घटस्फोट झाला आहे का? या बाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. पुणे पोलिसांनी याबाबतीतील अहवाल भारत सरकारला पाठवला आहे. त्यामध्ये दोघांचा घटस्फोट संमत्तीने २०१० साली झाला. घटस्फोटानंतरचे त्यांचे वागणे संशयास्पद असल्याचे पुणे समोर आले असल्याची माहिती आहे.

पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) कुटुंबीयांचे उत्पन्न कोटींमध्ये असल्याचे समोर आले होते. नॉनक्रीमीलिअरबाबत विशिष्ट उत्पन्नाची अट आहे. मात्र, पूजाचे वडील हे क्लास वन अधिकारी म्हणून कार्यरत होते. असे असताना त्यांचे उत्पन्न कमी कसे, असा प्रश्न उपस्थित निर्माण झाला होता. या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने तिने आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे आयोगाला सांगत पद मिळवले होते. पूजा खेडकर (Pooja Khedkar) हिची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांचा खरंच घटस्फोट झाला होता का, घटस्फोट फक्त पूजाला अधिकारी बनवण्यासाठी करण्यात आला, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यावरील अहवाल पुणे पोलिसांनी पाठवला आहे.

VIDEO- Pooja Khedkar Update : पूजा खेडकरच्या आई वडिलांच्या घटस्फोटासंदर्भात तपासाचा अहवाल सादर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...Pushpak Express Accident पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या..नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वरDevendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदतABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Embed widget