एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : 1500 की 3000 ? लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात नेमके किती रुपये मिळणार? आदिती तटकरेंनी समोर येऊन संभ्रम केला दूर!

Mazi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार? असे विचारले जात होते. यावरच आता आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेत असते. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. याच कारणामुळे यावेळी महिलांना मार्च आणि एप्रिल अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार का? असा सवाल केला जातोय. याच मुद्द्यावरून लाखो महिलांत संभ्रम निर्माण झाला आहे. यावरच आता महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्वत: समोर येऊन सगळा संभ्रम दूर केला आहे. 

आदिती तटकरे यांची विरोधकांवर टीका 

आदिती तटकरे यांनी मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेविषयी माहिती दिली आहे. "विरोधकांना सुरुवातीपासूनच ही योजना खुपते आहे. या योजनेमुळेच विरोधकांना नैराश्य आलं आहे. याआधी दोनी कोटी 25 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्याही लाभार्थी तेवढ्याच असतील. ही योजना जाहीर झाल्यापासूनच विरोधकांना ही योजना खुपते आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांत महिलांचा या योजनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेही विरोधकांमध्ये या योजनेबाबत नैराश्य आलेलं आहे. हेच नैराश्य ते लाडक्या बहि‍णींमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

दोन्ही महिन्यांचे पैसे नेमके कधी मिळणार? 

मात्र महायुतीचं सरकार हे सक्षम आहे. ही योजना आम्ही यशस्वीरित्या चालू ठेवणार आहोत. फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता हा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तर मार्च महिन्याचा हफ्ता हा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात टाकला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. 

दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार नाहीत

म्हणजेच आदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र मिळणार नाहीत. फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे 7 मार्च रोजी मिळतील. तर मार्च महिन्याचे पैसे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळतील, हे स्पष्ट झाले आहे. 

आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या, पाहा व्हिडीओ :

हेही वाचा :

Ladki Bahin : कोट्यवधी लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, फेब्रुवारीचे 1500 अन् मार्चचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी सगळं सांगितलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा अॅडव्हान्स, संजय राऊतांच्या पोस्टमुळं ऑपरेशन टायगरला पुष्टी?
खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा अॅडव्हान्स, संजय राऊतांच्या पोस्टमुळं ऑपरेशन टायगरला पुष्टी?
IAS Transfer : प्रशासकीय फेरबदलांचा वेग कायम , राज्यातील 12 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?
IAS Transfer : प्रशासकीय फेरबदलांचा वेग कायम , राज्यातील 12 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?
शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'वर मात करण्यासाठी ठाकरेंचे शिलेदार सरसावले; अरविंद सावंत, संजय राऊत आणि अनिल देसाई दिल्लीत
शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'वर मात करण्यासाठी ठाकरेंचे शिलेदार सरसावले; अरविंद सावंत, संजय राऊत आणि अनिल देसाई दिल्लीत
पावसानं दिली ओढ, बळीराजाचे डोळे आभाळाकडं! दुष्काळ पडणार नाही, पंजाबराव डखांनी पावसाबाबत दिली महत्वाची माहिती 
पावसानं दिली ओढ, बळीराजाचे डोळे आभाळाकडं! दुष्काळ पडणार नाही, पंजाबराव डखांनी पावसाबाबत दिली महत्वाची माहिती 

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Embed widget