एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्रातील पराभवाची कारणे शोधण्यासाठी युवक काँग्रेसची 'खुली चर्चा'
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष नेमका कुठे कमी पडला? यावर खुली चर्चा व्हावी यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव पत्कारावा लागल्यानंतर पक्षांतर्गत घडामोडींना वेग आलेला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली असून काँग्रेसच्या इतर नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रातही पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी युवक काँग्रेसकडून आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून खुली चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र युवक काँग्रेसकडून 3 जुन ला मुंबईतील काँग्रेस कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष नेमका कुठे कमी पडला? यावर खुली चर्चा व्हावी यासाठी बैठक बोलावल्याचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले आहे.
काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी नाही तर कोण?
'लोकसभेचा निकाल हा काँग्रेससाठी धक्कादायक आहे. परंतु हा जनादेश आपण नम्रपणे स्वीकारला पाहिजे. राज्यात आपण कुठे कमी पडलो याची खुली चर्चा व परीक्षण मोकळ्या वातावरणात व्हावे आणि चुकांपासून धडा घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनिती आखावी तसेच युवक काँग्रेसने कुठले कार्यक्रम राबवावे या उद्देशाने सदरील चर्चेचे आयोजन केले आहे', असे सत्यजीत तांबेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीले आहे.
युवक काँग्रेस तसेच विद्यार्थी काँग्रेसच्या नव्या-जुन्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. याच बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी युवक काँग्रेसच्या कामाच्या रणनिती देखील ठरवण्यात येईल असं सांगण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement