(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain Live updates : आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Live updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.
LIVE
Background
Maharashtra Rain Live Updates: राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.
राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी
राज्यातील नागपूर, मुंबईतील वांद्रे, दादर आणि ठाणे परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.
कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून मोसमी पाऊस सुरू होईल. त्यानंतर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत आहे. पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील पाणीसाठा तळाला गेला आहे.
शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत, पेरण्या खोळंबल्या
राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. लवकर पाऊस न पडल्यास आहे ती पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिकं वाया गेली आहेत.
रत्नागिरीत पहिल्याच पावसाचा मुंबई-गोवा महामार्गाला दणका, हातखंबा ते निवळी यादरम्यान रस्ता खचला
Ratnagiri Rain : रत्नागिरीत पहिल्याच पावसाचा मुंबई-गोवा महामार्गाला दणका बसला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील रस्ता खचला
हातखंबा ते निवळी यादरम्यान रस्ता खचला
मुंबई गोवा महामार्गाचे सुरू आहे चौपदरीकरण
मुंबई गोवा महामार्गावरून एकेरी वाहतूक
कालपासून रस्ता खचून ठेकेदाराच दुर्लक्ष
जेसीबीच्या साह्याने कसलेला भाग त्याचं काम सुरू
ठाण्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद
ठाण्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद
काल सकाळी 8.30 पासून ते आज सकाळी 8.30 पर्यंत म्हणजे गेल्या 24 तासात तब्बल 200.08मिमी पावसाची नोंद
यातील सर्वाधिक 89.91 मिमी पाऊस काल दुपारी 12.30 ते 2.30 या दोन तासात कोसळला
यावर्षी आता पर्यंत एकूण 506.46मिमी पावसाची नोंद
मध्यरात्री नंतर पावसाने उसंत घेतल्याने आज दैनंदिन व्यवहार सुरळीत
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं ठिकठिकाणी पाणी तुंबल
Palghar Rain : पालघर जिल्ह्यात काल दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे केळवे रोड, रोठा फाटक, रेल्वेचा नवीन भुयारी मार्ग, राईस मिल परिसरात पाणी तुंबलेले आहे. MRVC आणि DFCC च्या दोन्ही बाजूच्या भरावामुळं पूर्व पश्चिम या दोन्ही भागात रस्त्यांवरुन पाणी वाहत आहे.
Maharashtra Rain : आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. आजही राज्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.