नाशकात विधानसभेच्या जागेवरून मविआच्या इच्च्छुकांमध्ये रस्सीखेंच; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत संघर्ष बघायला मिळतोय. एक एक जागेवरून मविआत रस्सीखेच सुरु झाली असून इच्च्छुकांमध्येही जुंपण्याची शक्यता निर्माण झालीय.
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) संघर्ष बघायला मिळतोय. एक एक जागेवरून महाविकस आघाडीत रस्सीखेच सुरु झाली असून इच्च्छुकांमध्येही जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे इच्छुकांचे वादळ थोपविण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यासमोर राहणार आहे. तर नाशकात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना नेमकं कोणाला तिकीट मिळते आणि नाराजांची नाराजी कशी दूर होणार याकडे सऱ्यांचे लक्ष आता लागले आहे.
मविआच्या इच्च्छुकांमध्ये रस्सीखेंच, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला आता सुरवात झाली आहे. स्थानिक ते वरिष्ठ पातळीवर बैठका आणि आढावा घेण्यास सर्वच राजकीय पक्षात सुरवात झाली आहे. सत्ताधारी महायुती थेट मैदानात उतरली असून सरकरी योजना लोकापर्यंत पोचविण्याचा आटोकाट प्रयत्न आहे. तर महाविकास आघाडी कडूनही बैठका आणि उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. ठाकरे गटाने तर याही पुढे जाऊन नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांच्या नावाची घोषणाच करून टाकली आहे. नाशिक पश्चिम मधून जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, तर नाशिक मध्य मधून माजी आमदार वसंत गीते यांचे नाव एक मुखाने जाहीर केले आहेत.
मात्र, आता वसन्त गीते यांच्याच नावाला विरोध होत असून पक्षातूनच आव्हान दिले जात आहे. तर स्थायी समितीचे माजी सभापती संजय चव्हाण यांनी वसंत गीते यांच्या विरोधात दंड थोपटले असून जातीय समीकरणे आणि राजकीय अनुभवाच्या जोरावर आपणच सक्षम उमेदवार असल्याचा दावा केला आहे. ठाकरे गटात रस्सीखेच सुरु असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँगेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी नाशिक मध्य मतदार संघ काँग्रेसला सुटणार असून आपल्याच उमेदवारी मिळणार असल्याचा दावा केला आहे.
अनेक जागांवर महाविकस आघाडीत जुंपण्याची शक्यता
स्थानिक पातळीवर इच्छुकाचे दावे प्रतिदावे सुरु असताना ठाकरे गटाचे सचिव अनिल देसाई यांनी सबुरीने घेण्याचं सल्ला दिलाय. तर महाविकास आघाडीचे नेते ठरवतील त्याच्या पाठीशी ताकद उभी करण्याची ताकीद ही दिली आहे. नाशिक जिल्ह्यात विधानसभेच्या 15 जागा आहेत यातील देवळाली, इगतपुरी, सिन्नर असा अनेक जागांवर महाविकस आघाडीत जुंपण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाला तिकीट मिळते आणि नाराजांची नाराजी कशी दूर होणार याकडे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा