एक्स्प्लोर

विधानसभेची खडाजंगी : नाशिकमधील 15 विधानसभा मतदारसंघात कुणाचं वर्चस्व? आमदारांची संपूर्ण यादी; सध्याची राजकीय स्थिती जाणून घ्या

Maharashtra Vidhan Sabha Election : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राजकीय समीकरण बदलले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढत होणार आहे.

नाशिक : गेल्या काही काळापासून नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाला (Nashik Politics) विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सुरुवातीच्या काळात नाशिक जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. 1990 च्या दशकापासून नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस (Congress) पक्षाची राजकीय पकड सैल होत गेली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) नाशिक जिल्ह्याच्या विशेषतः ग्रामीण भागावर आपली राजकीय पकड मजबूत केली. तर 1990 च्या दशकापासूनच नाशिक जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण राजकारणात शिवसेनेने (Shiv Sena) आपले राजकीय स्थान बळकट केले होते. भारतीय जनता पक्षाने (BJP) 1990 च्या दशकापासून युतीच्या माध्यमातून व शिवसेनेची साथ करीत नाशिक जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात आपल्या पक्षसंघटनेस विस्तृत करून जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःची ताकद वाढविली. त्यानंतर 2002 ते 2007 या कालावधीत नाशिकच्या राजकारणात शिवसेना व भाजपने आपले वर्चस्व निर्माण केले होते. पुढे 2006 ते 2012 या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) बालेकिल्ला म्हणून नाशिक शहर नावारूपास आले होते. यानंतर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात नाशिकच्या राजकारण चढाओढ पहायला मिळाली.

सध्याच्या स्थितीत नाशिक जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट अर्थात महायुतीचीच सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरीची जागा महायुतीच्या (Mahayuti) हातून निसटली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पगडा भारी झाल्याचे बोलले आहे. येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोणात्या पक्षाची सत्ता येणार? हे आता काळच ठरवणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील विधानसभा मतदारसंघांची राजकीय स्थिती नेमकी कशी आहे? याबाबत जाणून घेऊयात... 

नाशिक जिल्ह्यात कुणाचं प्राबल्य?

नाशिकमध्ये एकूण 15 विधानसभा मतदारसंघ येतात. यात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, इगतपुरी, सिन्नर, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, नांदगाव, येवला, बागलाण, कळवण, दिंडोरी, निफाड, चांदवड या मतदारसंघांचा समावेश आहे.  नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सध्या नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा आमदार आहेत. यापाठोपाठ भाजपचे पाच आमदार, शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार, तर काँग्रेस आणि एमआयएमचे प्रत्येकी एक आमदार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य नाशिकमध्ये अधिक असल्याचे दिसून येते. तर भाजपदेखील 'काटे की टक्कर' देईल अशी चिन्ह आहेत. शिंदे गट, काँग्रेसला नाशिक लोकसभेच्या सत्तास्थापनेसाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला यंदा नाशिकमध्ये फायदा होणार, असे बोलले जात आहे. तर एमआयएम पक्ष नाशिकमध्ये किती उमेदवार देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

नाशिक जिल्ह्यातील आमदारांची यादी 

1) नाशिक पूर्व विधानसभा -  राहुल ढिकले (भाजप) (Rahul Dhikle)

2) नाशिक मध्य विधानसभा -  देवयानी फरांदे (भाजप) (Devyani Pharande)

3) नाशिक पश्चिम विधानसभा -  सीमा हिरे (भाजप) (Sima Hire)

4) देवळाली विधानसभा -  सरोज अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) (Saroj Ahire)

5) नांदगाव विधानसभा -  सुहास कांदे (शिवसेना - शिंदे गट) (Suhas Kande)

6) मालेगाव मध्य विधानसभा - मोहम्मद इस्माईल (MIM) (Mohammad Ismail)

7) मालेगाव बाह्य विधानसभा - दादा भुसे (शिवसेना - शिंदे गट) (Dada Bhuse)

8) बागलाण विधानसभा - दिलीप बोरसे (भाजप) (Dilip Borse) 

9) कळवण विधानसभा - नितीन पवार (राष्ट्रवादी - अजित पवार गट) (Nitin Pawar)

10) चांदवड विधानसभा - राहुल आहेर (भाजप) (Rahul Aher)

11) येवला विधानसभा - छगन भुजबळ (राष्ट्रवादी - अजित पवार गट) (Chhagan Bhujbal)

12) सिन्नर विधानसभा - माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी - अजित पवार गट) (Manikrao Kokate)

13) निफाड विधानसभा - दिलीप बनकर (राष्ट्रवादी - अजित पवार गट) (Dilip Bankar)

14) दिंडोरी विधानसभा - नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी- अजित पवार गट) (Narhari Zirwal)

15) इगतपुरी विधानसभा - हिरामण खोसकर (काँग्रेस) (Hiraman Khoskar)

विधानसभानिहाय 2019 मधील लढती आणि मताधिक्य

1) नाशिक पूर्व विधानसभा : या मतदारसंघात भाजपचे राहुल ढिकले आणि राष्ट्रवादीचे बाळसाहेब सानप यांच्या लढत झाली होती. राहुल ढिकले यांनी बाळासाहेब सानप यांचा 12 हजार मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला होता.

2) नाशिक मध्य विधानसभा : या मतदारसंघात काँग्रेसच्या हेमलता पाटील आणि भाजपच्या देवयानी फरांदे यांच्यात सामना रंगला होता. देवयानी फरांदे यांनी हेमलता पाटील यांचा 28 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. 

3) नाशिक पश्चिम विधानसभा : या मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. अपूर्व हिरे यांच्या प्रमुख लढत झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत सीमा हिरे यांनी विजय मिळवला. त्यांनी डॉ. अपूर्व हिरे यांचा 9746 मतांनी पराभव केला. 

4) देवळाली विधानसभा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे विरुद्ध शिवसेनेचे योगेश घोलप यांच्या या मतदारसंघात प्रमुख लढत झाली होती. सरोज अहिरे यांनी योगेश घोलप यांचा 41 हजार 702 मतांनी पराभव केला होता. 

5) नांदगाव विधानसभा : या मतदारसंघात शिवसेनेचे सुहास कांदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांच्यात थेट लढत झाली होती. या निवडणुकीत सुहास कांदे यांनी बाजी मारली. त्यांनी पंकज भुजबळ यांचा 13 हजार 889 मतांनी पराभव केला होता.

6) मालेगाव मध्य विधानसभा : एमआयएम पक्षाचे मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि काँग्रेसचे आसिफ शेख रशीद यांच्यात या मतदारसंघात प्रमुख लढत झाली होती.  मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी आसिफ शेख रशीद यांचा 38 हजार 519 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली. मौलाना मुफ्ती यांच्या विजयाने एमआयएम पक्षाने नाशिक राजकारणात पाय रोवले. 

7) मालेगाव बाह्य विधानसभा : या मतदारसंघात शिवसेनेचे दादा भुसे विरुध्द काँग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे यांच्यात सामना रंगला. दादा भुसे यांनी डॉ. तुषार शेवाळे यांचा 47 हजार 684 मतांनी पराभव करून विजय मिळवला आहे.

8) बागलाण विधानसभा : भाजपचे दिलीप बोरसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण यांच्या या मतदारसंघात प्रमुख लढत झाली होती. या निवडणुकीत दिलीप बोरसे यांनी गुलाल उधळला. त्यांनी दीपिका चव्हाण यांचा 33 हजार 694 मतांनी पराभव केला. 

9) कळवण विधानसभा : या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चे जिवा पांडू गावित यांच्यात प्रमुख लढत झाली. नितीन पवार यांनी जिवा पांडू गावित यांचा 6 हजार 596 मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला.     

10) चांदवड विधानसभा : भाजपचे डॉ. राहुल आहेर विरुद्ध काँग्रेसचे शिरीष कोतवाल यांच्यात या मतदारसंघात मुख्य लढत झाली. डॉ. राहुल आहेर यांनी शिरीष कोतवाल यांचा 26 हजार 537 मतांच्या फरकाने पराभव करून चांदवडची जागा जिंकली.

11) येवला विधानसभा : या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ विरुद्ध शिवेनेचे संभाजी पवार यांच्यात मुख्य लढत झाली होती. छगन भुजबळ यांनी संभाजी पवार यांचा 56 हजार 525 मतांच्या फरकाने परभव करत विजय मिळवला होता.  

12) सिन्नर विधानसभा : या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्यात प्रमुख लढत झाली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत माणिकराव कोकाटे यांनी राजाभाऊ वाजे यांचा 2 हजार 72 मतांनी पराभव केला होता. 

13) निफाड विधानसभा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप बनकर आणि शिवसेनेचे अनिल कदम यांच्यात या मतदारसंघात प्रमुख लढत झाली होती. दिलीप बनकर यांनी अनिल कदम यांचा 17 हजार 668 मतांच्या फरकाने पराभव करत निफाडची जागा जिंकली होती. 

14) दिंडोरी विधानसभा : या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी झिरवाळ आणि शिवसेनेचे भास्कर गावित यांच्या मुख्य लढत झाली होती. नरहरी झिरवाळ यांनी भास्कर गावित यांचा 60 हजार 813 मतांनी पराभव करत गुलाल उधळला होता. 

15) इगतपुरी विधानसभा : 2019 सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे हिरामण खोसकर विरुद्ध शिवसेनेच्या निर्मला गावित यांच्यात या मतदारसंघात प्रमुख लढत झाली होती. हिरामण खोसकर यांनी निर्मला गावित यांचा 31 हजार 555 मतांनी पराभव करून इगतपुरीची जागा जिंकली होती. 

जागावाटपात होणार तारेवरची कसरत 

महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकावेळी भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये थेट लढत होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत चित्र बदलले आहे. यंदा महायुतीकडून भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात लढत होणार आहे. यामुळे नाशिकमधील 15 विधानसभा मतदारसंघांचे जागावाटप करताना महायुती आणि महाविकास आघाडीची चांगलीच तारेवरची कसरत होणार आहे.  

मविआत वादाची ठिणगी

गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिमच्या जागेवर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने दावा केलाय. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांनी लढवण्याचा शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत घेतला आहे. विशेष म्हणजे दोघांच्या उमेदवारीबाबत एकमताने ठराव देखील करण्यात आला आहे. या ठरावावर काँग्रेसच्या हेमलता पाटील आणि शरद पवार गटाचे नितीन भोसले यांनी आक्षेप घेतल्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. 

महायुतीत मिठाचा खडा

तर दुसरीकडे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र यावरून शिवसेना शिंदे गट नाराज झाल्याचे दिसून आले आहे. दिंडोरीतील शिवसेना शिंदे गटाचे नेते धनराज महाले यांनी नरहरी झिरवाळ यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत झिरवाळ पिता-पुत्राने शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांचे काम केल्याचा आरोप करत धनराज महाले यांनी नरहरी झिरवाळ यांची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. यामुळे महायुतीत देखील तणाव असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीला जागावाटप करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे निश्चित आहे.

आणखी वाचा 

Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 16 March 2025Special Report | Beed Crime | बीडमध्ये चालकाला डांबून ठेवत जबर मारहाण, हत्येनंतरची ऑडिओ क्लिप व्हायरलSpecial Report | Beed Teacher Story | परिस्थिने हताश केलं, शिक्षकांने मृत्यूला कवटाळलं; धनंजय नागरगोजेंची मन हेलावून टाकणार पोस्टBhaskar Khatgaonkar : काँग्रेसचे भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिंदेंकडून पण होती ऑफर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Embed widget