एक्स्प्लोर

Ajit Pawar In Nashik : विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नाशिक दौरा रद्द

Ajit Pawar In Nashik : अजित पवारांचा (Ajit Pawar) नाशिक (Nashik) दौरा अचानक झाला रद्द झाला असून हेलिकॉप्टरमध्ये (Helicopter) तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Ajit Pawar In Nashik : अजित पवारांचा (Ajit Pawar) नाशिक (Nashik) दौरा अचानक झाला रद्द झाला असून हेलिकॉप्टरमध्ये (Helicopter) तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड नेमका कशामुळे झाला याचे कारण अस्पष्ट असल्याचे समजते आहे. 

विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर होते. नियोजित दौरा असल्याने सकाळी दहा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये पोहचणार असल्याचे दौऱ्यात म्हटले होते. मात्र तत्पूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. त्यामुळे अजित पवार यांचा आजचा नाशिक दौरा रद्द झाला आहे. दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये बिघाड नेमका कशामुळे झाला याचे कारण अस्पष्ट असल्याचे समजते आहे. 

दरम्यान कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याच्या 40 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवारांच्या हस्ते अकरा वाजता निफाड तालुक्यातील रानवडला होणार होता. त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत येथील स्वर्गीय अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेस ते भेट देणार होते. त्यासाठी ते थेट निफाडला पोहचणार होते. मात्र तत्पूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले.राजकीय नेत्यांच्या हेलिकॉप्टरसोबत अनुचित प्रकार होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. 

तर अजित पवार यांच्यासमवेत नाशिकमध्ये धनंजय मुंढे हे देखील उपस्थित असण्याची शक्यता होती, मात्र अजित पवार यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने संपूर्ण दौऱ्याबाबत अनिश्चितता निर्मण झाली आहे. तर मंत्री उदय सामंत हे नाशिक दौऱ्यावर येणार होते, मात्र त्यांचा दौरा रद्द झाल्याचे समजते आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात नंदुरबारमध्ये पोहचणार असून या ठिकाणी त्यांची सभा आहे.

अजित पवारांची सुरक्षा कमी केली.. 
दरम्यान महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने काढली आहे. मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाही जैसे थे ठेवण्यात आली आहे. महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढत शिंदे सरकारनं विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. शिंदे सरकारच्या या निर्णायावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यामध्ये अजित पवार यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंढे यांचीदेखील सुरक्षा काढण्यात आली आहे. शिंदे सरकारच्या या निर्णायावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget