Maharashtra Breaking News LIVE Updates : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात चार जण जागीच ठार
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
तीन वाहनांच्या विचित्र अपघातात चार जण जागीच ठार
शिक्रापूर :पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर इथे एका भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले असे असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तीन वाहनांचा हा विचित्र अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथील 24 वा मैल इथे भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने नगरच्या दिशेने जाणारा ट्रक दुभाजकला धडकून विरुद्ध बाजूला पलटी झाला त्यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कार आणि दोन टू व्हीलर गाड्यांना ट्रकने जोरदार धडक दिली अशी प्राथमिक माहिती आहे .
या भीषण अपघाताची माहिती तातडीने शिक्रापूर पोलिसांना देण्यात आली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातात विठ्ठल हिंगाडे आणि रेश्मा हिंगाडे या पती पत्नी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर कार मधील लिना निकसे यांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. मृता मधील एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नसून जखमींची ही ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सुरळीत केली.
उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता
पुढील 12 तासांत उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता.. सुमारे तास 20-30 किमी वेगाने धुळीचे वारे येण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज..
ऐतिहासिक दिवस, कळवा-मुंब्रा मार्गाने धावली फास्ट लोकल...
आज इतिहासात पहिल्यांदाच ठाणे ते दिवा या स्थानकांच्या दरम्यान फास्ट लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या कळवा आणि मुंब्रा स्थानकांच्या मार्गे धावत आहेत. आज पर्यंत सर्व फास्ट लोकल या ठाणे स्थानका नंतर पारसिक बोगद्यातून पुढे दिवा स्थानकाच्या दिशेने जायच्या. त्यामुळे कळवा आणि मुंब्रा स्थानकांच्या मार्गाने कधीच फास्ट लोकल धावली नाहीत. मात्र मध्य रेल्वेवर आज जो मेगाब्लॉक घेण्यात आला त्यानंतर सीएसएमटी वरून येणाऱ्या फास्ट लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. या फास्ट लोकल आणि एक्सप्रेस गाड्या आता नवीन मार्गीकेवरुन धावत आहेत. त्यामुळे हा एक ऐतिहासिक क्षण मानला जातोय. या फास्ट लोकल चालण्यासाठी आधीच कळवा आणि मुंब्रा स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि चार बनवण्यात आलेले आहेत. मात्र असे असले तरी सध्या या स्थानकात कोणतेही फास्ट लोकल थांबणार नाही. त्यासाठी बहात्तर तसांच्या जम्बो मेगाब्लॉक पूर्ण होण्याची वाट बघावी लागेल. या ऐतिहासिक क्षणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी ...
केज पोलिसांनी तंबाखूयुक्त पदार्थांची वाहतूक करणारा ट्रक पकडला.. बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त
दफनभूमीसाठी जागा झाली उपलब्ध, मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधव खुश
ठाण्यातील कळवा परिसरात मुस्लीम आणि ख्रिश्चन समाज झपाट्याने वाढत आहे. परंतु त्यांच्यासाठी दफनभूमी उपलब्ध नव्हती. या ठिकाणच्या ख्रिश्चन बांधवांना दफन करण्यासाठी ठाणे, मुलुंड, सायन या ठिकाणी जावे लागत होते त्यामुळे या परिसरात दफनभूमी उपलब्ध व्हावी यासाठी ख्रिश्चन समाजाकडून गेल्या १२ वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता. तसेच मुस्लीम समाजातील बांधवांसाठी सुध्दा ठाण्यात एकच दफनभूमी उपलब्ध आहे. त्यामुळे कळवा येथे दफनभूमीसाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरातील ख्रिश्चन आणि मुस्लीम समाजाकडून होत होती. या मागणीनंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक मिलिंद पाटील यांनी या दफनभूमीसाठी जागा शोधून त्याचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर नगरसेवक मिलिंद पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा येथील मनीषा नगर परिसरात दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. ही जागा आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत स्वाधीन करण्यात आली आहे. याठिकाणी दफनभूमीसाठी उपलब्ध झालेल्या जागेपैकी ५० टक्के जागा ही मुस्लीम बांधवांच्या दफनभूमीसाठी आणि उर्वरित ५० टक्के जागा हि ख्रिश्चन बांधवांच्या दफनभूमीसाठी विभागून देण्यात आली आहे. हा सामाजिक समतेचा भाग असून समाजाची प्रमुख गरज आहे. हि गोष्ट आमच्याकडून पूर्ण करण्यात आली. हे पुण्याईच काम असून ती जागा मिळवून देण्यात आमचा खारीचा वाटा आहे याचा आनंद वाटत असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
